Nalasopara News: नालासोपाऱ्यात ATMचा धक्कादायक कारनामा! 4 हजार काढले, 'इतके' मिळाले, नोट पाहून ग्राहक चक्रावला

इतकेच नव्हे तर, ४,००० रुपयांपैकी प्रत्यक्ष मोजणी केली असता केवळ ३,६०० रुपयेच बाहेर आल्याचे उघड झाले, ज्यामुळे ग्राहकाला तब्बल ४०० रुपयांचा थेट फटका बसला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, नालासोपारा:

Nalasopara ATM Scam:  नालासोपारा येथील गालानगर भागात असलेल्या हिताची (Hitachi) कंपनीच्या युपीआय एटीएम मधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने 'युपीआय कॅश विथड्रॉल'चा पर्याय वापरून या एटीएममधून 4000 रुपये काढले होते. मात्र, मशिनमधून पैसे बाहेर आल्यानंतर ग्राहकाने जेव्हा नोटा तपासल्या, तेव्हा त्यामध्ये २०० रुपयांची एक नोट पूर्णपणे फाटलेली निघाली. इतकेच नव्हे तर, ४,००० रुपयांपैकी प्रत्यक्ष मोजणी केली असता केवळ ३,६०० रुपयेच बाहेर आल्याचे उघड झाले, ज्यामुळे ग्राहकाला तब्बल ४०० रुपयांचा थेट फटका बसला आहे.

एकाच घरातील तीन दिवे विझले; खेडमध्ये काळजाचा थरकाप उडवणाऱ्या दुर्घटनेचा मृत्यूपूर्वीचा Video Viral

नालासोपाऱ्यात एटीएममधून निघाली फाटकी नोट..

पैसे कमी आल्याचे आणि नोट फाटलेली असल्याचे लक्षात येताच ग्राहकाने एटीएम सेंटरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर सर्व नोटांची मोजणी करून हा संपूर्ण प्रकार रेकॉर्ड केला, जेणेकरून बँक प्रशासनाकडे याचा भक्कम पुरावा राहील. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, यामुळे एटीएमच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Advertisement

विशेष म्हणजे मागील महिन्यात वसईतील गोलानी नाका परिसरातील देखील याच हिताची कंपनीच्या एटीएममध्ये  तांत्रिक बिघाड झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. एटीएममधून ग्राहकांनी जितकी रक्कम काढण्याची विनंती केली, त्यापेक्षा अनेक पटीने जास्त रक्कम मशीनमधून बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला.

एका ग्राहकाने १०० रुपये काढण्याची कमांड दिल्यानंतर एटीएममधून तब्बल ५०० रुपये बाहेर येत होते . मात्र खात्यातून फक्त १०० रुपयेच डेबिट झाल्याची नोंद दिसत होती. तसेच ४०० रुपये काढण्याची विनंती केल्यावर मशीनमधून २००० रुपये बाहेर येत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यामुळे आता संबंधित कंपनी यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

( नक्की वाचा : 'तिने आरडाओरड केली अन्..." डहाणूमध्ये तरुणीच्या धाडसामुळे टळला मोठा अनर्थ; लव्ह जिहादनंतर आणखी एक प्रकार )