नंदुरबार: राज्यात खून दरोडे, मारामाऱ्यांच्या वाढत्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरांमध्ये, प्रवासादरम्यान नागरिकांना लुटल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बसस्थानक किंवा गर्दीच्या ठिकाणी चोख सुरक्षा ठेवणे अपेक्षित असताना नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा बसस्थानकात मात्र प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, आंतरराज्य प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाचे बस स्थानक म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस स्थानकाची ओळख आहे. या बस स्थानकातून मध्य प्रदेश गुजरात आणि तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची नेहमी वर्दळ असते शहादा बस स्थानकावर होणाऱ्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहादा बस स्थानक परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेरे फक्त नावालाच असल्याची स्थिती आहे तर पोलीस चौकीची दुरावस्था आहे.
दररोजच्या होणाऱ्या छोट्या मोठ्या चोरीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे या ठिकाणी असलेल्या पोलीस चौकीची दुरुस्तीची आवश्यकता असून त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे तर शहादा बस स्थानकावर होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याचेशहादा पोलिसांना समोर मोठे आवाहन आहे. मात्र पोलिसांकडूनही उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे.
नक्की वाचा - भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी कशी झाली? पडद्याआड काय घडलं? वाचा Inside Story
दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे सातपुड्याच्या डोंगराळ भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील मोरबा नदीला मे महिन्यात पूर आल्याचे पाहण्यास मिळाले उन्हाळ्यात नदीला पूर आल्याचे पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.