Nandurbar News: खाऊ घेतला, लाडक्या लेकींना भेटायला वडील निघाले, नियतीचा क्रुर खेळ अन् भयंकर घडलं!

मुलींना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासाठी खाऊ घेऊन ते प्रेमाने निघाले होते. मात्र नियतीने क्रूर घाव घालत त्यांच्या मुलींना भेटण्याची शेवटची इच्छाही अपूर्णच ठेवली.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रशांत जव्हेरी, नंदुरबार:

Nandurbar News:  नंदुरबारमधून काळीज पिळवटून टाकणारी अपघाताची बातमी समोर आली आहे. आश्रमशाळेतील मुलींना भेटायला निघालेल्या पित्याचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नंदुरबारमध्ये घडली आहे. लाडक्या लेकींना खाऊ घेऊन भेटायला निघाले पण रस्त्यातच नियतीने घात केला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

मुलींना भेटायला जाताना पित्याचा अंत

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आपल्या मुलींना भेटण्यासाठी प्रेमाने खाऊ घेऊन निघालेल्या पित्याचा भरधाव अज्ञात वाहनाने जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना सुरत–धुळे राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी नजीक घडली आहे. या भीषण अपघातात बंधारपाडा येथील मनेष शिवाजी गावीत (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी रेहनी मनेष गावित वय ३५ जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच!

घराचा कर्ता पुरुष गेला..

मनेष गावीत हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. ते रिक्षा चालवून व शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधारवडच हरपला आहे.आपल्या मुलींना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासाठी खाऊ घेऊन ते प्रेमाने निघाले होते. मात्र नियतीने क्रूर घाव घालत त्यांच्या मुलींना भेटण्याची शेवटची इच्छाही अपूर्णच ठेवली.

घरातील एकमेव कमावता हात गेल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

( नक्की वाचा : MHADA Lottery: लकी ड्रॉ नाही, आता डायरेक्ट घर! म्हाडाची मुंबईकरांसाठी मोठी ऑफर, 'या' पद्धतीनं करा लगेच बुक )

Topics mentioned in this article