सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 मे रोजी गोवर्धन गो शाळा शुभारंभ होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. राज्याच्या तुलनेत एक वेगळी गो शाळा जिल्ह्यात होणार आहे असे म्हणत गाय म्हणजे समृद्धी, जिल्ह्यातील लोकांनी गाय पाळावी म्हणजे समृद्धीचा मार्ग येईल म्हणून मी हा प्रयत्न करतोय.. असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले नारायण राणे?
'हिंदू धर्मात गो माता पवित्र मानल जाते. ही देशातील वेगळी गो शाळा असून देशभरातील वेगवेगळ्या गाई यात आहेत. जिल्ह्यातील लोकांनी गाई पाळल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करत असून गाईच दूध संकलन केंद्र देखील सुरू करणार आहे. शेणापासून खत, गॅस तसेच रंग बनवला जाईल. गोमूत्रापासून औषध बनवली जातील..' अशी माहिती नारायण राणे म्हणाले.
'मी 1982 सालापासून मुंबईत चिकनचा व्यवसाय करतोय. हा व्यवसाय आता भाऊ करतो. आम्ही फक्त गल्ल्यावर बसतो. कापणारे वेगळे असतात. काही लोक कोंबडीवाला म्हणून आमचा उल्लेख करतात, मात्र भ्रष्टाचार करण्यापेक्षा व्यवसाय करण चांगले. भ्रष्टाचार करणारे मातोश्रीवर आहेत. कोव्हिडमध्ये त्यांनी औषधात भ्रष्टाचार केला..' असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
नक्की वाचा - Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य
दरम्यान, मी जिल्ह्यात किवा राज्यात कुणालाही त्रास देत नाही, त्रास देणारे आमचे विरोधक करतात. कुणाकडून पैसे घेतले असल्याचा एक पुरावा दाखवा मी पदावर राहणार नाही. जे विनायक राऊत सगळीकडे भ्रष्टाचार केला ते आमच्यावर टीका करतात, त्याने तोंड बंद करावं त्याचं तोड बघण्यासाठी त्यांकडे काही नाही.. असा टोलाही त्यांनी यांना लगावला.
नक्की वाचा - Kashmir Pahalgam terror attack : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 700 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य