जाहिरात

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! बड्या अधिकाऱ्यांसह बिल्डरही अडकणार? 300 कोटींची जमीन अन्...

याप्रकरणी काही  जमीन खरेदी-विक्री एजेंटची चौकशी झाल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. नाशिक,  पुणे ,अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी देखील एसआयटीच्या रडावर आहेत.

Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! बड्या अधिकाऱ्यांसह बिल्डरही अडकणार? 300 कोटींची जमीन अन्...

राहुल वाघ, नाशिक:

Nashik Ashok Kharat Case:  नाशिकमधील अश्लील कांड प्रकरणातील आरोपी भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री झाली आहे. अशोक खरात प्रकरणाची आता ईडीकडूनही चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. अशोक खरात प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, तसेच एसआयटीकडूनही योग्य तपास सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्यानंतर आता भोंदू अशोक खरात प्रकरणात आता जमीन खरेदी विक्री एजंट ही एसआयटीच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे. 

Nagpur News: "नोकरीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलावलं अन्...", नागपूरमधील धक्कादायक प्रकार

अशोक खरात प्रकरणात बिल्डरही रडारवर! 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भोंदू अशोक खरात प्रकरणात आता जमीन खरेदी विक्री एजंट ही एसआयटीच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी काही  जमीन खरेदी-विक्री एजेंटची चौकशी झाल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. नाशिक,  पुणे ,अहिल्यानगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी देखील एसआयटीच्या रडावर आहेत.

तब्बल साठ लाखांची जमीन 22 लाखात बळकावल्याचा गुन्ह्यात अशोक खरात सोबत फिर्यादीची ओळख एजंटच्या माध्यमातून झाल्याची माहिती समोर आली असून  जमीन खरेदी विक्री व्यवहारात अनेक ब्रोकर तसेच शासनातील अधिकारी अशोक खरातला मदत करत होते का? असा संशय व्यक्त केला आहे.  त्याचबरोबर पुण्यामधील पाच तर नाशिकमधील दोन बिल्डरही एसआयटीच्या रडारवर असल्याचे समोर आले आहे.

बिल्डरांच्या मदतीने अशोक खरातने जवळपास 300 कोटींचा जमीन  व्यवहार केल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमधील दोन बांधकाम व्यवसायिकांनी अशोक खरातच्या मदतीने मोक्याच्या जमिनी लाटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी ईडीची एन्ट्री होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. 

नक्की वाचा-  Baramati Election: बारामतीत तिरंगी लढत! काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरोधात दिला तगडा उमेदवार; कोण-कोण मैदानात?)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com