VIDEO: विठ्ठलाशी तुलना अन् अभिषेक... कॅप्टन खरातसोबत रुपाली चाकणकरांचे 2 नवे व्हिडिओ

सर्वांना पंढरीला जाऊन दर्शन घेता आलं नाही ते दर्शन आज गुरु पोर्णिमेच्या निमित्ताने झाले," असं त्या म्हणत आहेत. चाकणकर यांच्या या नव्या व्हिडिओवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Ashok Kharat Case Rupali Chakankar: नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अत्याचार प्रकरणाचे नवनवे खुलासे होते आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव पुढे येत आहे. अत्याचारी बाबा अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो तसेच व्हिडिओ समोर येत आहेत. याआधी रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या पाय धुताना दिसल्या होत्या, ज्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशातच आता रुपाली चाकणकर यांचे आणखी दोन व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 

रुपाली चाकणकरांचे दोन नवे व्हिडिओ 

नाशिकमधील बलात्कारी बाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या भोंदुबाबा सोबतचा रुपाली चाकणकरांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये महादेवाच्या पिंडीला अभिषेक केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे या पुजेवेळी अशोक खरात आणि त्याची पत्नी खुर्चीवर बसलेल्या आहेत तर रुपाली चाकणकर या खाली जमिनीवर बसलेल्या दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ ईशान्येश्वर मंदिरामधील आहे की ईतर कोणत्या मंदिरातील? हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. 

Advertisement

Ashok Kharat: वायग्रा मिश्रित ओश्नो जल काय? जे घेण्यासाठी नेत्यांची रांग लागायची; दमानियांचे खळबळजनक आरोप

दुसरीकडे, रुपाली चाकणकर यांची अशोक खरात याच्यावरील भक्तीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर या भोंदुबाबाची थेट विठ्ठलाशी तुलना करताना दिसत आहेत. "नुकतीच आषाढी एकादशी झाली. सर तुम्हाला आणि कल्पना ताईंना पाहून विठ्ठल- रुक्मिणीची आठवण झाली. सर्वांना पंढरीला जाऊन दर्शन घेता आलं नाही ते दर्शन आज गुरु पोर्णिमेच्या निमित्ताने झाले," असं त्या म्हणत आहेत. चाकणकर यांच्या या नव्या व्हिडिओवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.

सुषमा अंधारेंकडून अटकेची मागणी 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. तसेच रुपाली चाकणकर फरार आहेत अशा बातम्या समोर येत आहेत. त्या पाताळात लपल्या असतील तरी शोधून काढा असं म्हणत अंजली दमानिया यांनीही रुपाली चाकणकर यांंना अटक करण्याची मागणी केली आहे. 

Amol Mitkari: अशोक खरात प्रकरणात मिटकरींचा 'ट्विट' बॉम्ब! 'VSR' कनेक्शन आणि अजितदादांचा घात झाल्याचा संशय