Amol Mitkari Tweet: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कारनामे आता केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित राहिले नसून, त्यात आता 'अघोरी विद्या' आणि राजकीय षडयंत्राचा शिरकाव झाला आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर काही विशिष्ट तारखांचा उल्लेख करत या प्रकरणाला नवीन वळण दिले आहे.
मिटकरींच्या ट्विटमधील मुद्दे
अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 18, 19 आणि 20 नोव्हेंबर 2025 या दिवसांमध्ये शिवरात्री आणि अमावास्या होत्या. याच काळात भिगवण रोडवरील सहयोग सोसायटी परिसरात अघोरी पूजा करण्यात आल्याचा दावा मिटकरींनी केला आहे.
अशोक खरातचा 'शिवलिका आश्रम' हा भगवान शंकराच्या पूजेचा असला तरी, तिथे गुपचूप अघोरी विधी चालत असत. राजकीय लाभासाठी काही 'भक्त' या पूजा करत असल्याचा त्यांचा संशय आहे. अमोल मिटकरींनी स्पष्टपणे 'VSR' (ज्याचा संबंध विलासराव साळुंखे आणि रूपाली चाकणकर यांच्याशी जोडला जात आहे) कनेक्शनचा उल्लेख केला आहे.

(नक्की वाचा- Ashok Kharat: अशोक खरात प्रकरण; रूपाली चाकणकरांच्या व्हायरल व्हिडीओ खळबळ, राजकारण पेटलं)
27 जानेवारीला कारने पुण्याला जाणारे अजितदादा 28 तारखेला सकाळी अचानक 'VSR' विमानाने का गेले? या भोंदू बाबाचा भक्त कोण होता, ज्याने दादांना चुकीचा सल्ला दिला? 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या दरम्यानचे अशोक खरात आणि आश्रमातील पुजाऱ्यांचे CDR काढल्यास, अजितदादांचा घात कसा झाला याचे सत्य समोर येईल, असे मिटकरी म्हणाले आहेत.
धुके की धोका?
मिटकरींनी आपल्या ट्विटमध्ये "धुके की धोका??" असा सूचक प्रश्न विचारला आहे. अजित पवार हे कधीही कर्मकांड मानणारे नेते नव्हते, तरीही त्यांना या अघोरी विधींच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला का? आणि यात खरातच्या भक्तांचा काय रोल होता? यावर आता मोठी चर्चा सुरू आहे.
अमोल मिटकरी यांनी गृहखात्याकडे आणि पोलिसांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. विशेषतः त्या तीन दिवसांतील अघोरी पूजा आणि त्यामागील राजकीय सूत्रधार शोधणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Rahit Pawar Tweet
रोहित पवार यांचाही हल्लाबोल
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अमोल मिटकरींच्या ट्वीटला टॅग करत म्हटलं की, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु अमोलजी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते.
(नक्की वाचा- Pune Petrol Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा पुण्याला फटका; पेट्रोलच्या दरात मोठी वाढ)
राजकीय राक्षस कोण?
"नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. मा. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही" असा सल्ला देखील रोहित पवार यांनी दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world