अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:
Captain Amol Kharat Case: भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांना शिकार बनवणाऱ्या कॅप्टन अशोक खरात याचे नवनवे प्रताप समोर येत आहेत. कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढत आहेत. मात्र रुपाली चाकणकर यांनी याबाबत मौन बाळगले असून त्या अद्याप माध्यमांसमोर आल्या नाहीत. अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
Ashok Kharat News: अजित पवारांच्या बंगल्यासमोर अघोरी पुजा, अशोक खरात मास्टरमाईंड? धक्कादायक दावा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा फरार..?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार आहेत, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे. फेसबुकवर पोस्ट करत रुपाली ठोंबरे पाटील यांनी हा दावा करत रुपाली चाकणकर यांना पुन्हा लक्ष केले आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांच्यावर मोठी टीका होत आहे, मात् गेल्या दोन दिवसापासून रुपाली चाकणकर या माध्यमांसमोर येत नसल्याने रूपाली ठोंबरे यांनी ही पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अशोक खरातवर आरोप करणाऱ्या एका पत्रकाराला राज्य महिला आयोगाने माफी मागायला लावली होती. तेव्हाच चाकणकरांनी दखल घेतली असती तर अनेक महिला बळी झाल्या नसत्या. रुपाली चाकणकर यांनी खरातला अभय दिले आहे, रूपाली चाकणकर यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारून तातडीने पायउतार व्हावे, तसेच या प्रकरणात त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.