Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! पुन्हा 4 मुलींसह एका मुलाचे अपहरण, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

एका मुलासह चार मुलींचे अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा तीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले असून, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, नाशिक:

Nashik Child Kidnapping: गेल्या काही दिवसांपासून मुंबई, नाशिकमध्ये अल्पवयीन मुले, मुलींच्या अपहरणाच्या घटना वारंवार घडत आहेत. शाळकरी मुला- मुलींना फूस लावून पळवल्याच्या घटनांनी पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये एका मुलासह चार मुलींसह एका मुलाला पळवल्याची घटना घडली होती. अशातच आता आणखी तीन मुलींचे अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. 

Navi Mumbai: नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ अटक, रक्कम पाहून म्हणाल...

नाशिकमधील अपहरण सत्र थांबेना..

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी तीव्र खळबळ उडाली आहे. मुंबई आणि नाशिक पट्ट्यात अशा घटनांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने पालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी एका मुलासह चार मुलींचे अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा तीन मुली बेपत्ता झाल्याचे समोर आले असून, पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Advertisement

​शहरातील सरकारवाडा, मुंबई नाका, अंबड आणि नाशिक रोड यांसारख्या वर्दळीच्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या अल्पवयीन मुलींना कशाचे तरी आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेण्यात आले आहे. नाशिक शहर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून विविध पथके तपासासाठी रवाना केली आहेत.

पालकांमध्ये भिताचे वातावरण 

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले हे अपहरणाचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने सामाजिक सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
​शाळकरी मुला-मुलींना लक्ष्य केले जात असल्याने शाळा आणि महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. 

नक्की वाचा - Ashok Kharat: 4650 व्हिडीओ, 451 अकाऊंट डिलीट! खरातच्या SIT चौकशी समोर आले 'हे' 5 धक्कादायक राज

Topics mentioned in this article