जाहिरात

Nashik Accident: रात्रीच्या अंधारात अनर्थ.. एकाच घरातील 9 जणांचा अंत, कार विहिरीत कशी पडली?

Nashik Dindori Car Accident:  गाडीच्या काचा बंद असल्याने सगळे लोक गाडीतच अडकून पडले. गाडीतील लोक काचा फोडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही मिनिटातच संपूर्ण गाडी बुडाली.

Nashik Accident: रात्रीच्या अंधारात अनर्थ.. एकाच घरातील 9 जणांचा अंत,  कार विहिरीत कशी पडली?

राहुल वाघ, नाशिक:

Nashik Dindori Accident:  नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील इंदोरे परिसरात एका अपघातात ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेने संपूर्ण राज्यात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.  एका खाजगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून घरी परतत असताना, चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट अगदी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत जाऊन पडली. या अपघातात इंदोरे गावचे सुनील दरगुडे आणि त्यांच्या नातेवाईकांसह नऊ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश असल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

कसा झाला भीषण अपघात? 

मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंट काँक्रीटचा कॉलनी रस्ता जिथे संपतो, त्याच्या अवघ्या ३-५ फुटांवर समोरच ही विहीर आहे. रात्री दहाच्या सुमारास कार्यक्रम संपवून घरी परतत असताना अंधारामुळे चालकाला विहिरीचा अंदाज आला नसावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. कठडा तोडून कार थेट विहिरीत कोसळली. मोठा आवाज झाल्याने आजू बाजूचे लोकं धावत आले, विहिरीत गाडी 5 मिनिट दिसत होती, गाडीचे टेल लॅम्प दिसत होते. मात्र 5 मिनिटानंतर गाडी दिसेनाशी झाली.  गाडीच्या काचा बंद असल्याने सगळे लोक गाडीतच अडकून पडले. गाडीतील लोक काचा फोडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही मिनिटातच संपूर्ण गाडी बुडाली.

Pune News: माऊलींच्या पालखी सोहळ्यात धक्कादायक प्रकार! गोंधळ, भिती, भाविकांची धावपळ, 65 जण जखमी

साधारण 20 मिनिटानंतर अग्निशमन दल आणि प्रशासनाचे लोक आले. NDRF चे पथकही पोहोचले होते. विहिरीत मोठा दोरखंड टाकण्यात आले. मोटार लावून विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचा स्थानिकांनी प्रयत्न केला. मात्र तब्बल सव्वा दोन तासानंतर गाडी बाहेर काढण्यात आली.  या प्रकरणी दिंडोरी पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत विहीर मालक राजेंद्र राजे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यालगत असलेल्या विहिरीला सुरक्षा भिंत नसल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.

विहीर मालकावर गुन्हा, कुटुंबियांना 5 लाखांची मदत 

तसेच, खाजगी क्लासचे संचालक सचिन वडजे यांचीही चौकशी सुरू करण्यात आली असून, स्नेहसंमेलनासाठी आवश्यक परवानगी घेतली होती का, याची तपासणी पोलीस करत आहेत.  याच आज मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी करून प्रशासनाला तत्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश दिले असून,दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.तसेच मयताच्या घरच्यांना सरकार कडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ज्यावेळेस रस्ता मंजूर झाला त्यावेळेस प्रशासनाने यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं आपण बघतो ज्यावेळेस एखादा झाड जरी आडवं येत तरी त्या झाडाची कत्तल केली जाते ही तर विहीर होती तत्काळ बुजवली गेली पाहिजे होती दिंडोरी तालुक्याच्या ऐतिहासिकतील इतक्या जणांचा मृत्यू होणं ही पहिलीच घटना आहे.

Bhandara News: पंधरा दिवसात 2 बळी, मुलांच्या शाळा बंद, घराबाहेर पडणे मुश्किल.. भंडाऱ्यात काय घडतंय?

सुनील दत्तात्रय दरगोडे, रेश्मा सुनील दरगोडे, आशा अनिल दरगोडे, गुणवंती सुनील दरगोडे, श्रेयश अनिल दरगोडे , श्रावणी अनिल दरगोडे, सृष्टी अनिल दरगोडे , समृद्धी राजेंद्र दरगोडे , आणि श्रद्धा अनिल दरगोडे असे या अपघातात मयत पावलेल्यांची नावे आहेत. या संपूर्ण प्रकरणी आता दिंडोरी पोलिसांमार्फत अधिक चौकशी केली जात आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com