राहुल वाघ, दिंडोरी:
Nashik Dinodri News: नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच दिंडोरीमधून आणखी मन सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दिंडोरी तालुक्यात घडली आहे.
चार शाळकरी मुलांच्या मृत्यूने हळहळ
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दोन वेगळ्या घटनांमध्ये नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील चार शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. दिंडोरीच्या मोहाडी येथील फटांगळे कुटुंबियांच्या खेरवाडी येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात रुद्र जाधव व ओमकार फटांगळे हे खेळता खेळता तलावाजवळ गेले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! पुन्हा 4 मुलींसह एका मुलाचे अपहरण, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण
दुसऱ्या घटनेत परमोरी येथील नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या समीर गांगोडे व यश पगारे पैकी यश पाण्यात गटांगळ्या खात असल्याने पाहून समीर त्याला वाचविण्यासाठी गेले असता दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले. एकाच दिवशी चार शाळकरी विद्यार्थी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
लातूरमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
लातूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली असून, विनयभंगाच्या तक्रारीवर गुन्हा नोंद न झाल्याने एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने हातावर काहींची नावे लिहून ठेवत गंभीर आरोप केले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी त्रास व धमक्या दिल्याचा आरोप असून, या मानसिक तणावातूनच शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world