Nashik News: नाशिककरांनी लक्ष द्या! शहरातील अत्यंत महत्त्वाचा चौक 3 महिने बंद; वाहतुकीचा मोठा खोळंबा

१८ जुलैपर्यंत हा परिसर निर्बंधांखाली राहणार असून, यामुळे नाशिककरांसह महामार्गावरील प्रवाशांची मोठी कसोटी लागणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

राहुल वाघ, नाशिक:

Nashik Dwarka Circle Closed: 2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यासाठी गोदावरीच्या काठावर 12 नवीन घाट, 400 एकर जागा आरक्षित करणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. याच कुंभमेळ्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून पुढील तीन महिने शहरातील द्वारका सर्कल बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Politics: 'काँग्रेसचा जप आणि खोटारडेपणाचा गजर', हर्षवर्धन सपकाळांचा PM मोदींच्या भाषणावरुन पलटवार

द्वारका चौक 3 महिने बंद 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांनी आता वेग घेतला असून, त्याचा मोठा परिणाम शहरातील वाहतुकीवर होणार आहे. नाशिकचे प्रवेशद्वार समजला जाणारा ‘द्वारका सर्कल' आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १८ जुलैपर्यंत हा परिसर निर्बंधांखाली राहणार असून, यामुळे नाशिककरांसह महामार्गावरील प्रवाशांची मोठी कसोटी लागणार आहे.

Advertisement

​द्वारका सर्कल कायमस्वरूपी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अंडरपासचे काम संथगतीने सुरू होते. मात्र, कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असल्याने आता या कामाला युद्धपातळीवर गती दिली जात आहे. परिणामी, द्वारका सर्कलकडे जाणारे सर्व मुख्य रस्ते बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत.

नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात भीम ज्योत कार्यक्रमात ‘बूट' वाद; दोन आमदारांवर आरोप, वंचित बहुजन आघाडी आक्रमक

वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली 

दरम्यान, या बदलामुळे मुंबई-आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्गावरून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Topics mentioned in this article