Nashik Rain Alert: नाशिककरांनो सावधान! आभाळ फाटणार, सर्व पर्यटन स्थळे बंद, IMDचा हायअलर्ट

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nashik Rain Alert: मुंबईसह राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, पुण्यात धुवाँधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह अनेक मोठे महामार्ग ठप्प झाले आहेत. अशातच आता मंगळवारी (7 जुलै) नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Maval Landslide: मावळात 'माळीण'ची पुनरावृत्ती! अख्खं कुटुंब ढिगाऱ्याखाली गाडलं, तिघांचे मृतदेह सापडले

नाशिकमध्ये ढगफुटी होणार.. सर्व पर्यटनस्थळे बंद!

समोर आलेल्या माहितीनुसार,  नाशिक जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद राहणार आहेत.  दुगारवाडी धबधबा, हरिहर गड, पहिने, पर्यटने स्थळे पुढिल आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचे आदेश वनपरीक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी काढलेत. नाशिकमध्ये उद्या असणाऱ्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

Advertisement

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडवर आली आहे. याचसंदर्भात दुपारी अडीच वाजता नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांना  प्रशासनाकडून गरज असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Mumbai Pune Rain LIVE: लोकलच्या तिन्ही मार्गांवर वाहतूक ठप्प! CSTकडे येणाऱ्या गाड्या थांबल्या; वाचा LIVE अपडेट