Maval Landslide News: पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या मावळ तालुक्यातील पाटण गावात आज सोमवारी (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत संपुर्ण कुटुंब गाडले गेले होते, ज्यापैकी तीन मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले आहेत.
मावळात मोठी दुर्घटना, दरड कोसळून तिघांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, मावळातील पाटण गावात पहाटे 4.25 वाजता चार घरांवर डोंगरकडा कोसळले. यामध्ये 30 ते 35 लोक अडकले होते. परंतू एकाच घरातील तीन जण मृत्यूमुखी पडले आहेत. नंदू तिकोने (वय 60). माऊली तिकोने (वय 30) अनिता तिकोने (वय 55) एनडीआरएफ टीम कडून दोन मृतदेह काढण्यात आले आहेत. मलबा हटवण्याचे काम अजूनही सुरू आहे. तिसरा महिलेचा मृतदेह शोध सुरू आहे.
पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि स्थानिक महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल असून बचावकार्य सुरू करण्यात आले . मुसळधार पाऊस आणि चिखलाचे साम्राज्य यामुळे सुरुवातीला बचावकार्यात अडथळे येत होते, मात्र स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने तातडीने मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले आहे.
NDRFच्या ३० जवानांचे विशेष पथक दाखल
मातीचा आणि दगडांचा मोठा ढिगारा असल्याने स्थानिक पातळीवरील मदत अपुरी पडत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पुणे येथील ५ व्या बटालियनला पाचारण करण्यात आले आहे. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली एनडीआरएफचे ३० सदस्यांचे त्यात एक अधिकारी, दोन वरिष्ठ अधिकारी व २७ जवान पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी ५.५० वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world