Nashik Dargah destroyed : नाशिकमधील अनधिकृत हजरत सय्यद सातपीर बाबा दर्गा पालिकेकडून पाडला...

नाशिकमधील पखाल रोड परिसरातील काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर बाबा दर्गा अखेर पालिकेकडून पाडण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Nashik Dargah destroyed

Nashik Dargah destroyed : नाशिकमधील पखाल रोड परिसरातील काठे गल्लीतील अनधिकृत हजरत सय्यद सातपीर बाबा दर्गा अखेर पालिकेकडून पाडण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक पालिकेने हा दर्गा अनधिकृत असल्याचं सांगतल 1 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. त्यानंतर आज हा दर्जा पालिकेकडून पाडण्यात आला आहे. काल 15 एप्रिल रोजी रात्री बंदोबस्तासाठी गेलेल्या पोलिसांवर आज पहाटे जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये  10 ते 12 पोलीस कर्मचारी, 4 अधिकारी जखमी, पाच पोलीस वाहनांचेही नुकसान झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील काठे गल्लीतील हा दर्गा अनधिकृत असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं होतं. यासाठी1एप्रिलला नोटीसही जारी करण्यात आली आहे. यावेळी दर्ग्याला स्वत:हून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशारा देण्यात आला होता. अखेर आज यावर कारवाई करण्यात येणार होती, त्यासाठी काल 15 एप्रिलपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दर्ग्यावर कारवाई केली जाईल यामुळे आज काही जमावांकडून तोडफोड करण्यात आली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली होती. अखेर आज सकाळी साधारण 9.30 ते 10 च्या दरम्यान येथील दर्गा पाडण्यात आला.  4 जेसीबी, 6 ट्रक, 2 डंपरच्या सहाय्याने हे अतिक्रमण काढण्यात आले असून 50 कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते.

Advertisement

नक्की वाचा - Nashik Dargah News : दर्ग्यावरुन नाशिकमध्ये मोठा राडा; पोलिसांच्या वाहनांची तोडफोड


ठाकरे गटाकडून संताप...


आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा आहे. या मेळाव्यात अडथळा आणण्यासाठी आजच ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. या कारवाईसाठी आजचा दिवस कसा सापडला असा सवाल राऊतांकडून करण्यात आला आहे. 

Advertisement