Nashik To Ayodhya Flight: प्रभू श्रीरामांचे दर्शन अवघ्या काही तासात! नाशिक ते अयोध्या विमानसेवा सुरु; वाचा सविस्तर..

Nashik Ozar Airport Connectivity: अयोध्या, दरभंगासह, तिरुपती, श्रीनगर, चंदिगड, गुवाहाटी, कोइंबतूर, कोलकाता अशा 35 प्रमुख शहरांचा समावेश आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक: नाशिककरांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. नाशिककरांना आता प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणे सहज शक्य होणार आहे. कारण नाशिक ते अयोध्या अशी विमानसेवा सुरु होत आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरून 31 मार्च मध्यरात्री पासून प्रमुख पस्तीस शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमधून आता श्रीनगर आणि अयोध्येचा प्रवास अवघ्या काही तासांमध्ये करता येणार आहे. नाशिक ते अयोध्या विमानसेवा सुरु झाल्याने भाविकांना आता या तिर्थक्षेत्रांचे दर्शन घेणे अधिक सोपे होणार आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावरुन 31 मार्चपासून देशातील 35 प्रमुख शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरु होणार आहे. यामध्ये अयोध्या, दरभंगासह, तिरुपती, श्रीनगर, चंदिगड, गुवाहाटी, कोइंबतूर, कोलकाता अशा 35 प्रमुख शहरांचा समावेश आहे. 

(नक्की वाचा-  Rain Alert : ठाणे, पुण्यासह या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट)

नाशिकच्या ओझर विमानतळावरुन अवघ्या काही तासात तुम्ही कोईमतुरपर्यंत जाऊ शकता. त्यामुळे उटीला जाण्यासाठी सुलभता होणार असून कनेक्टिव्हिटीही वाढणार आहे. देशातील सर्वच भागात सुरु होणाऱ्या विमानसेवेमुळे नाशिकमध्ये दळणवळण वाढणार आहे. साहजिकच त्याचा फायदा शहराच्या पर्यटनाला आणि उद्योगाला होणार आहे. तसेच रोजगार वाढण्यासही मदत होणार आहे. 

(नक्की वाचा- Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले)