जाहिरात

Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले

वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण करण्यात आली. असा आरोप महादेव गित्ते याने केला आहे.

Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले
बीड:

वाल्मीक कराड हा सध्या संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात बीड कारागृहात आहे. मात्र त्याचे तिथे ही कारनामे सुरू असल्याचं आता समोर येत आहे. वाल्मीकला या कारागृहात मारहाण झाली अशी बातमी समोर आली होती. त्यानंतर काही आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या कारगृहात हलवण्यात आले. त्यावेळी त्यांना घेवून जात असताना त्यांनी गंभीर आरोप वाल्मीक कराडवर केले आहेत. शिवाय बीड कारागृहात काय सुरू आहे हे ही त्यांनी धडाधड सांगितले.यावेळी त्यांनी कारागृहाच्या जेलरवरही गंभीर आरोप केले आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

    महादेव गित्ते सरपंच बापू अंधळे हत्या प्रकरणात बीड कारागृहात आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बबन गित्तेचा तो उजवा हात समजला जातो. याच महादेव गित्ते आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वाल्मीक कराडवर बीड कारागृहात हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर महादेव गित्ते आणि त्याच्या सहकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या कारगृहात हलवण्यात आले. त्यांना बाहेर घेवून जात असतांना त्यांनी कारागृहात नेमकं काय झालं हेच सांगितलं. 

    ट्रेंडिंग बातमी - Chhatrapati Sambhajinagar : आईने रचला लेकाच्या हत्येचा कट, कारणही हादरवणारं!

    वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून आम्हाला मारहाण करण्यात आली. असा आरोप महादेव गित्ते याने केला आहे. आम्हालाच मारहाण करून आमच्यावरच आरोप लावण्यात आला. वाल्मीकच्या सांगण्यावरूनच आम्हाला छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आलं आहे, असं ही तो यावेळी म्हणाले. शिवाय जेलचा जेलरही वाल्मीकला मिळाला आहे. जेलर प्रत्येक गोष्टीत वाल्मीकला मदत करत आहे असा आरोही त्याने केला. 

    ट्रेंडिंग बातमी - CM Fadnavis Speech: फडणवीसांंना शाळेत 'या' विषयाची वाटायची भीती; अकरावीला काय केलं? सांगितला किस्सा

    वाल्मीकला खाण्या पिण्याच्या गोष्टी ही पुरवल्या जात असल्याचं तो यावेळी म्हणाला. आम्हाला मारहाण झाली आहे याचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले जावे असं ही त्याने सांगितले. या वेळी पोलिस गित्ते आणि त्याच्या सहकाऱ्यांना गाडीत कोंबत होते. शेवटी पोलिसांची गाडी या सर्वांना घेवून छ. संभाजीनगरच्या दिशेने गेली. पण तेवढ्या वेळात त्यांनी जे काही सांगितलं त्यामुळे वाल्मीक बरोबरच जेलच्या जेलरच्याही अडचणी वाढण्याची शक्यता जास्त आहे. बीडच्या जिल्हा कारागृहात सकाळी दोन कैद्यामध्ये मारहाणीची घटना घडली होती. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून महादेव गित्तेसह इतर काही कैद्यांना हलवले गेले आहे.