Navi Panvel News: सोसायटीच्या बैठकीत राडा! अध्यक्षाच्या मुलाकडून रहिवाशांना बेदम मारहाण

पनवेल सेक्टर १४ येथील 'अमृतवेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी' (E१/१९) मध्ये पुनर्विकासाच्या (Redevelopment) विषयावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मोठा राडा झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Navi Mumbai Crime: नवी पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ​न्यू पनवेलमध्ये सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत तुफान राडा झाला आहे. यावेळी सोसायटी अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीने रहिवाशांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत मयुर गावंड हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

सोसायटीच्या बैठकीत राडा

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  एकीकडे सिडको कॉलनीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचे वारे वाहत असतानाच, दुसरीकडे याच मुद्द्यावरून आता सोसायट्यांमध्ये हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. न्यू पनवेल सेक्टर १४ येथील 'अमृतवेल को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी' (E१/१९) मध्ये पुनर्विकासाच्या (Redevelopment) विषयावर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मोठा राडा झाला.

Ajit Pawar Plane Case: अजितदादांच्या अपघात प्रकरणी सर्वात मोठी अपडेट; व्ही के सिंगचा CID समोर खळबळजनक दावा

 अमृतवेल सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पुनर्विकासाच्या अटी आणि प्रक्रियेवरून सभासद आणि व्यवस्थापन समितीमध्ये शाब्दिक चकमक उडाली. वादाचे रूपांतर लवकरच धक्काबुक्कीत झाले. आरोप आहे की, वादादरम्यान अध्यक्ष रवींद्र भगत यांचा मुलगा अजिंक्य भगत याने काही बाहेरील तरुणांना सोसायटीत पाचारण केले.

तरुणाला बेदम मारहाण 

या टोळक्याने बैठकीत घुसून उपस्थित रहिवाशांना बेदम मारहाण केली. तसेच या सोसायटीतील दोन जण यांना जखमी झाली असून पनवेल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आला आहे सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र भगत आणि त्यांचा मुलगा अजिंक्य भगत यांनी बाहेरील मुले बोलावून रहिवाशांना मारहाण केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. असा आरोप सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे.

Palghar News: महिला दिनीच गर्भवतीचे हाल, शासकीय रुग्णालयात प्रवेश नाकारला; प्रसुतीसाठी रात्रभर धावपळ