Navale Bridge PMPML Rules: नवले पुलावर वेगमर्यादा! अपघात रोखण्यासाठी PMPMLचा मोठा निर्णय, बस स्टॉपही हलवला

PMPML New Rules: केवळ वेगमर्यादा निश्चित करून न थांबता, PMPML ने नवले पूल परिसरातील सध्याचा धोकादायक बस थांबाही तात्काळ स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रेवती हिंगवे, पुणे:

Pune Navale Bridge PMPML Rules:  पुण्यातील नवले पुलावर झालेल्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरुन गेला. मागील आठवड्यात एका ब्रेक फेल कंटेनरने आठ जणांचा जीव घेतला.  नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांच्या पार्श्वभूमीवर, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) प्रशासनाने प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वाचा आणि तात्काळ निर्णय घेतला आहे. 

PMPMLचा मोठा निर्णय, नवले पुलावर वेगमर्यादा!

समोर आलेल्या माहितीनुसार, कात्रज नवीन बोगदा ते चांदणी चौक (Katraj Tunnel to Chandni Chowk) या अपघातप्रवण उतारावर पीएमपीएलच्या बस चालकांना प्रतितास ३० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने बसेस न चालवण्याचे कठोर आदेश जारी करण्यात आले आहेत. ​केवळ वेगमर्यादा निश्चित करून न थांबता, PMPML ने नवले पूल परिसरातील सध्याचा धोकादायक बस थांबाही तात्काळ स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Navale Bridge News: वाहनांचा वेग, ते स्पीड गन्स.. नवले पुलावर आता 'हे' नवे नियम; मोडल्यास थेट कारवाई!

या स्थलांतरामुळे प्रवाशांना महामार्गाच्या मुख्य प्रवाहातून दूर सुरक्षित ठिकाणी बसची वाट पाहणे शक्य होणार आहे. प्रशासनाने बस चालकांना आणि संबंधित कर्मचाऱ्यांना या नव्या नियमांची व सुरक्षितता उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विशेष सूचना आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. 

याआधी नवले पूल परिसरात वाहनांची वेगमर्यादा 60 किलोमीटर वरुन 30 किलोमीटर प्रतितास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तसेच वाहनांच्या वेगावर स्पीडगनद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. सोबतच अवजड वाहनांमध्ये असणारा लोड खेड- शिवापूर टोलनाक्यावर चेक केला जाईल. जो जास्त असेल तर दंडही आकारला जाईल आणि लोड कमी केला जाईल, असंही मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले होते. 

Advertisement

या उपाययोजना केल्या जाणार!

  • वाहनांची वेगमर्यादा प्रतितास 60 ऐवजी 30 किमी करावी.
  • रस्त्यावरील सूचना फलक, दिशादर्शकांची संख्या वाढवावी.
  • स्पीड गन्सची संख्या तीनऐवजी सहा करावी.
  • पीएमपीने अधिकृत बसथांबे उभारावेत. 
  • यंत्रणांनी आपापल्या हद्दीतील अतिक्रमणे हटवावीत. 

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर वारंवार अपघात का होतात?