जाहिरात

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर वारंवार अपघात का होतात?

Navale Bridge Accident: नवले ब्रीज अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक, मालक आणि क्लीनर या तिघांविरोधात निष्काळजीपणाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर वारंवार अपघात का होतात?

Pune News: पुण्यातील नवले ब्रिज तिथे होणाऱ्या अपघातांमुळे नेहमीच चर्चेत असतो. असाच एक भीषण अपघात नवले ब्रिजवर गुरुवारी गुरुवारी दुपारी सातारा-पुणे मार्गावर ब्रेक- फेल ट्रकने अनके वाहनांना धडक दिली. त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र नवले ब्रिजवर वारंवार होणाऱ्या अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ट्रक चालक, मालकासह क्लीनरवर गुन्हा दाखल

नवले ब्रीज अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा चालक, मालक आणि क्लीनर या तिघांविरोधात निष्काळजीपणाच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघाताच्या नेमक्या कारणांचा सखोल तपास सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृत्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देखील जाहीर केली आहे.

(नक्की वाचा-  Solapur Lawyer Suicide: वकीलाच्या आत्महत्येने खळबळ, सुसाईड नोटमध्ये आईवर गंभीर आरोप)

नवले ब्रिजवर अपघात का होतात?

नवले ब्रिजवर अपघात का होतात याबाबत तज्ज्ञांनी म्हटलं की, नवले ब्रिजवर तीव्र उतार आहे. त्यामुळे येथे वाहनांचा अचानक ब्रेक लागत नाही. अशावेळी वेगात असलेली वाहने पुढील वाहनांना जाऊन धडकतात. याशिवाय या मार्गावर सर्व्हिस रोड देखील नाही. सर्व्हिस रोड नसल्यामुळे सर्वच वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होते. अपुरे बॅरिअर्स, सूचना बोर्ड नाही, रस्ता ओलांडण्यासाठी ओव्हर ब्रिज नाही, पादचारी मार्ग नाही, अशा अनेक समस्या येथे आहेत. या सगळ्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता वाढते.

(नक्की वाचा-  Pune Accident: देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला, एकाच कुटुंबातील तिघांसह कारमधील 5 जणांचा मृत्यू)

अपघात रोखण्यासाठी काय गरजेचे?

नवले ब्रिजवरील अपघात रोखणे ही हे प्रशासनासमोरील मोठं आव्हान आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या उताराची तीव्रता कमी करण्याची गरज आहे. नवले ब्रिज ते वडगाव पुलादरम्यान सर्व्हिस रोड वाढवण्याची गरज आहे. कात्रज बोगदा ते वडगाव पूल या चार किलोमीटरच्या पट्ट्यात वाहन चालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com