Baramati Elections: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, समोर नोटांचा ढीग अन्... VIRAL व्हिडिओने बारामतीचे राजकारण तापलं

अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटलांचा पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाच्या या व्हिडिओबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, बारामती:

Baramati Municipal Corporation Election 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी तो फेटाळून लावला होता. मात्र आता युगेंद्र पवार यांनी जो दावा केला होता त्या दाव्याला अधिकची भर देणारा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोसिन पठाण यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटलांचा पैशाच्या बॅगेसह पैसे मोजतानाच्या या व्हिडिओबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. 

जय पाटील यांचा पैसे मोजतानाचा व्हिडिओ व्हायरल... 

बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर करून मतदारांना अमिष दाखवले जात आहे सदर बाबीची चौकशी करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे जय पाटील यांनी हे आरोप फेटाळले आहेत या संदर्भात आपण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Mahakal : उज्जैन महाकाल मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा, मशीद समितीचा दावा सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला

बारामतीत एक व्हिडिओ समोर येतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) बारामती शहर अध्यक्ष जय पाटील व वॉर्ड २ मधील बिनविरोध निवडून आलेल्या अनुप्रिता अक्षय डांगे नगरसेविकेच्या नवऱ्याचा पैश्याची बॅगमधून पैसे काढून मोजतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. आता मुळात हा व्हिडिओ खरा आहे की खोटा याचा तपास आपण करावा, अशी मागणी होत आहे. 

 जर हा व्हिडिओ खरा असेल तर निवडणूक काळात यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला. ते पैसे हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये  का मोजत आहेत? अनुप्रिता अक्षय डांगे यांनी बिनविरोध निवडून येण्यासाठी पैसे दिले आहेत का? व अशा इतर प्रश्नांवर SIT व ACB मार्फत तातडीत चौकशी व्हावी.जर हा व्हिडिओ खरा असेल तर हा पैसा कुठून आला व याचा वापर कुठ झाला, याचा तपास व्हावा.

Vasai Virar News: हितेंद्र ठाकूर यांना रोखण्यासाठी भाजप- शिवसेना एकत्र! विरारमध्ये राजकारण तापणार

तसेच या व्हिडिओमध्ये ही दोघे पैशाचे नोटांचे सीरियल मोजताना दिसत आहेत. याची सखोल चौकशी व्हावी, असे म्हणत युगेंद्र पवार यांनी लावलेल्या आर्थिक व्यवहाराच्या आरोपप्रमाणे ज्या ८ वॉर्डात बिनविरोध उमेदवार निवडून आले आहेत. त्या वॉर्डात जे निवडून व ज्यांनी माघार घेतली त्यांची SIT, ACB,ED मार्फत चौकशी व्हावी आणि या ८ वार्डात पण पुन्हा नव्याने निवडणूक घ्यावी.अशी मागणी मोसीन पठाण यांनी केली आहे.

Advertisement