Ajit Pawar Death: 'ज्यांनी हे पाप केलं असेल, भविष्यात त्यांच्या...' अमोल मिटकरींचा शाप

आमदार अमोल मिटकरी यांनी या विमान अपघातावरुन काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबतच अमोल मिटकरी यांनी केलेल्या नव्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Amol Mitkari On Ajit Pawar Plane Crash:  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूने महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होत आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या मृत्यूमागे मोठे षडयंत्र अन् घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचेच आमदार अमोल मिटकरी यांनी या विमान अपघातावरुन काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबतच अमोल मिटकरी यांनी केलेल्या नव्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

ज्यांनी हे पाप केलं असेल...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. "माझा विश्वास आहे आणि माझ मन सांगतय दादा असे जाऊच शकत नाहीत. ज्यांनी कुणी हा देवमाणुस हिरावून नेण्याच पाप केल असेल भविष्यात त्यांच्या घरात त्यांची चिता जाळणारा कुणी शिल्लक नसेल", देवा तुला कुठ रे शोधायचं" असे भावुक ट्वीट त्यांनी केले आहे. 

NCP Merger: पटेल-तटकरेंना राष्ट्रवादीचे विलीनीकरण नकोय, हा अमित शाह-फडणवीसांचाच अजेंडा, सामना अग्रलेखातून टीका

याआधीही अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या निधनावरुन काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे, असं ते म्हणाले होते. 

अपघातानंतर उपस्थित केले महत्त्वाचे सवाल..

तसेच अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? सहावी व्यक्ती कुठे गेली? Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? असे महत्त्वाचे सवालही त्यांनी उपस्थित केलेत. दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. यासाठी मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह रेल्वेमंत्र्यांची  भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

Advertisement

Sunetra Pawar: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा पहिला दौरा! पोरक्या झालेल्या लेकरांची भेट घेणार