'आम्ही एका ताटात जेवलो, ते विसरले असतील पण मी नाही विसरणार', NCP वर्धापनदिन सोहळ्यात सुप्रिया सुळेंचा टोला

राष्ट्रवादीच्या स्थापनेला आज 26 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने पुण्यात शरद पवार गटाने वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन केलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

राष्ट्रवादीच्या स्थापनेला आज 26 वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्ताने पुण्यात शरद पवार गटाने वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी शरद पवार गटातील नेत्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला आजही पहिला वर्धापन दिन आठवतो. कोणालाही वाटलंही नव्हतं, की सहा महिन्यात आपण सत्तेत येऊ. मात्र पक्ष स्थापनेच्या सहा महिन्यात आपण सत्तेत आलो आणि सलग 15 वर्षे राष्ट्रवादी सत्तेत राहिली.  अनेकांनी पक्षाला योगदान दिलं. आबांची, मधुकर पिचड यांची आठवण येते. काही लोक आपल्याला सोडून गेले. ज्याने त्याने आपला मार्ग निवडला. मी चार निवडणुका लढले, त्यातील तीन निवडणुकीत त्यांनी माझी मदत केली. एका निवडणुकीत विरोध केला. कधीतरी आम्ही एका ताटात जेवलो, ते विसरले असतील पण मी नाही विसरणार, कारण हे माझे संस्कार आहे; असं म्हणत सुप्रिया सुळेंनी नाव न घेता अजित पवारांना टोला दिला. 

Advertisement

नक्की वाचा - Jayant Patil : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठा ड्रामा, जयंत पाटलांनी उडवून दिली खळबळ

साताऱ्यातील एका फोटोने निवडणूक फिरली...
बघता बघता राष्ट्रवादीला 26 वर्षे पूर्ण झाली आहे. पक्ष बांधणीमध्ये असंख्य जणांचं योगदान आहे. या काळात महत्त्वाच्या क्षणांमध्ये साताऱ्यातील त्या फोटोचा उल्लेख करावाचा वाटतो. कारण साताऱ्याच्या एका फोटोने 2019 ची निवडणूक फिरवली. त्यामुळे यश अपयश प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतं. ते आपल्याही आलं. 
 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world