Parth Pawar Kainat Dhar Engagement: राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरी पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत. दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांचा साखरपुडा संपन्न होणार आहे. अभिनेत्री, मॉडेल कायनात धार हिच्याशी पार्थ पवार यांचा विवाह निश्चित झाला आहे. 29 जुलै रोजी पुण्यामध्ये त्यांचा साखरपुडा होणार असल्याचे समोर आले आहे.
पवार कुटुंबात पुन्हा एकदा लगीनघाई!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार पार्थ पवार आणि कायनात धार यांचा 29 जुलैला पुण्यात साखरपुडा संपन्न होणार आहे. अजितदादांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण न झाल्यामुळे घरगुती पद्धतीने साखरपुडा करण्याचा निर्णय पवार कुटुंबियांनी घेतला आहे. पार्थ पवार आणि कायनाथ धार यांची अनेक वर्षांची मैत्री आहे. दिवंगत नेते अजित पवार यांनीही पार्थ पवार आणि कायनात धार यांच्या विवाहाला परवानगी दिली होती.
कोण आहे कायनात धर?
कायनात धार ही कायनाथ धार ही मूळची काश्मिरची सध्या दिल्लीत वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. पार्थ पवार आणि कायनात यांची मैत्री होती त्याच मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आता दोघेही लग्नगाठ बांधणार आहेत. कायनातचे कुटुंबियांशी त्यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संंबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळेच्या लग्नात पार्थ पवार यांच्यासोबत दिसल्यानंतर कायनात धार चर्चेत आली होती.
याआधी पार्थ पवार आणि कायनात धार हे दोघेही मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकाल मंदिरात एकत्र दर्शन घेताना दिसले होते. तसेच अजित पवार यांचे निधन झाल्यानंतरही ती पवार कुटुंबियांसोबत दिसली होती. मुंबई येथे झालेल्या शोकसभेलाही ती उपस्थित होती.