जाहिरात

Mauli Palkhi Pune: ....म्हणून अवघड दिवे घाटाची वाट सहज होते पार; माऊलींच्या पालखीत वडकीकरांची अनोखी सेवा

दुसरीकडे दिवेघाटातून पालखी सुखरूपपणे पुढे सासवडच्या दिशेने जावी यासाठी वडकी गावातील शेतकरी सज्ज झाले आहेत.

Mauli Palkhi Pune: ....म्हणून अवघड दिवे घाटाची वाट सहज होते पार; माऊलींच्या पालखीत वडकीकरांची अनोखी सेवा

अविनाश पवार, पुणे:

Sant Dnyaneshwar Mauli Palkhi Sohala Pune:  दोन दिवस पुण्यात मुक्काम केल्यानंतर आज संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी पुढच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. संत तुकाराम महाराज यांची पालखी आज लोणीकाळभोर ला मुक्कामी असेल तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज अवघड दिवे घाट चढून सासवडला मुक्कामी जाईल. दिवेघाटात पालखीला मार्गस्थ करण्यासाठी वडकीच्या शेतकऱ्यांकडून अनोखी सेवा केली जाते ज्यामुळे घाट सहजपणे पार होतो.

Ashadhi Wari 2026 Live Tracker: पालखी सध्या कुठे? एका क्लिकवर करा चेक, पुणे पोलिसांचे 24 तास 'स्मार्ट' नियोजन

अवघड दिवे घाट कसा होतो पार? पालखी सोहळ्यासाठी अनोखी सेवा 

समोर आलेल्या माहितीनुसार,  संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्यातील मुक्काम आटोपून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. एकीकडे पुणेकर भावपूर्ण वातावरणात पालखीला निरोप देणार आहेत, तर दुसरीकडे दिवेघाटातून पालखी सुखरूपपणे पुढे सासवडच्या दिशेने जावी यासाठी वडकी गावातील शेतकरी सज्ज झाले आहेत.

पालखी सोहळ्यातील मानाचे बैल पालखीचा रथ ओढतात. मात्र दिवेघाटाचा चढ पार करताना या बैलांवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून वडकी गावातील शेतकरी दरवर्षी आपल्या बैलांची जोड पालखीला लावतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जात आहे. यासाठी शेतकरी वर्षभर आपल्या बैलांची विशेष तयारी करतात.

दिवेघाटातील चढ सहज पार व्हावा आणि माऊलींची पालखी कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे मार्गस्थ व्हावी, हा या सेवेचा मुख्य उद्देश असतो. माऊलींच्या पालखीला हातभार लावण्याची संधी मिळणे हेच आपले भाग्य असल्याची भावना या शेतकऱ्यांच्या मनात असते. त्यामुळे ही सेवा केवळ परंपरा नसून माऊलींच्या चरणी अर्पण केलेली भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक बनली आहे.

Traffic Changes: पुणे- पंढरपूर महामार्गावरील वाहतुकीत बदल! कोणते रस्ते बंद? जाणून घ्या पर्यायी मार्ग

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com