Sharad Pawar : शरद पवारांची तब्येत खालावली! नियोजित कार्यक्रम रद्द

Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची तब्येत खालावली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवारांना खोकला झाला आहे. त्यामुळे त्यांना बोलताना घश्याचा त्रास होत आहे. या कारणामुळे खबरदारी म्हणून त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'एएनआय' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांना खोकला झाल्यानं बोलण्यात त्रास होत आहे.  त्यांना कार्यक्रमामध्ये भाषण करणे शक्य नाही. त्यामुळे पुढच्या चार दिवसांचे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून देण्यात आली आहे.

शरद पवार-अजित पवार आले होते एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला. त्यांना अवघ्या 10 जागा मिळाल्या. या पक्षानं लोकसभा निवडणुकीत 8 जागा जिंकत दमदार कामगिरी केली होती. विधानसभा निवडणुकीत त्यांना या यशाची पुनरावृत्ती करता आली नाही. या पराभवानंतर लगेच शरद पवार पुन्हा एकदा कामाला लागले आहेत.

काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या सर्वसाधारण सभेला शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. 

विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. 'आमचं कुटुंब एकच;, असं पवार कुटुंबीय सांगत असतात. वर्षभरात दोघे एकत्र येतील, असा विश्वास  अजित पवारांच्या आई आशाताई पवारांनी पंढरपुरातील विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केला होता. त्यातच पवार आणि ठाकरे केंद्रात भाजपसोबत जातील, असं वक्तव्य माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलं होतं.
 

Advertisement