NDTV Marathi Manch Conclave: विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. त्याच निमित्ताने एनडीटीव्ही मराठी मंच या कार्यक्रमात राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मंत्री झालेले आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत बोलतानाच आबिटकर यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले प्रकाश आबिटकर?
'आरोग्यव्यवस्था म्हणल्यानंतर साहजिकच तात्काळ उपलब्धता हवी असते ती नाही झाली तर लोक साहजिकच लोक पॅनिक होतात. आरोग्य विभागामध्ये काम करण्याची संधी पहिल्यांदा मला मिळाली. महाराष्ट्राच्या साडेबारा जनतेचे आशीर्वाद घेण्याचे पुण्याईचे काम मला मिळाले," असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील तपासणी लॅबबाबत एक महत्वाचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.
"राज्यातल्या सर्व तपासणी लॅब आहेत त्याच्यावर मॉनिटरींग केले जात नव्हते, त्यामध्ये काही गैरप्रकार होत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा कोणताही कायदा नव्हता. तो निर्णय आम्ही घेत आहोत. त्यामध्ये या लॅबमध्ये होणाऱ्या तपासणी योग्य प्रकारे होत आहेत का? याची पाहणी केली जाईल आणि गैरप्रकार आढळल्यास त्यावर कारवाई केली जाईल. येणाऱ्या अधिवेशनामध्ये आम्ही हा विषय मांडून त्याच्या कायद्याची अंमलबजावणी करु," अशी महत्वाची माहिती प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
त्याचबरोबर, "गेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमात आम्हाला मुख्यमंत्र्यांनी टार्गेट दिले होते. आम्ही अडीच कोटी महिलांची तपासणी करायची होती, त्यामध्ये 1 कोटी महिलांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली. ज्या महिला कधी रुग्णालयात जात नव्हत्या, ग्रामीण भागातल्या महिला त्यांची तपासणी झाली. सगळ्या कुटंबाची काळजी करताना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलाही काळजी घेऊ लागल्या.. असे म्हणत राज्यातील आरोग्यव्यवस्था सुधारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादनही त्यांनी दिले.