जाहिरात

Big News: चीनने अरुणाचल प्रदेशच्या 22 ठिकाणांची परस्पर बदलली नावं, मुख्यमंत्री म्हणतात हा तर...

चीनने सीमा भागात खूप आधी काम करण्यास सुरूवात केली आहे. मात्र आपल्या सरकारने Vibrant Village program दोन वर्षा पुर्वीच सुरू केला आहे.

Big News: चीनने अरुणाचल प्रदेशच्या 22 ठिकाणांची परस्पर बदलली नावं, मुख्यमंत्री म्हणतात हा तर...

चीनच्या अरुणाचल प्रदेशबाबतीत आपल्या खुरापती सुरूच ठेवल्या आहेत. चीनने आता परत एकदा अरुणाचल प्रदेशातल्या 22 ठिकाणांची नावं परस्पर बदली आहेत. यावर अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. शिवाय चीनची ही जुनी खोड असल्याचं म्हटलं आहे. शिवाय ते म्हाणाले की चीनने अरुणाचलच्या काही भागांचे नाव बदलण्याचा प्रकार काही नवा नाही, हे तिन चार वेळा झालं आहे. याची केंद्र सरकारने ही दखल घेतली आहे. शिवाय अरुणाचल प्रदेशही या कृतीचा निषेध करते अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

चीनने सीमा भागात खूप आधी काम करण्यास सुरूवात केली आहे.  मात्र आपल्या सरकारने Vibrant Village program  दोन वर्षा पुर्वीच सुरू केला आहे. सीमा भागात रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत. शिवाय लोकांचे राहाणीमान उंचावण्यासाठी कामं सुरू असल्याचं ही ते म्हणाले. चीनने जी कृती केली आहे त्याच  अरुणाचल प्रदेशचे लोक निषेध करतात असंही खांडू यांनी स्पष्ट केले. Vibrant Village Program चा परिणाम दिसत आहे असंही ते म्हणाले. त्यामुळेच चीन अशा पद्धतीची कृती करत असल्याचे ते म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी -  Sharad Pawar : पवार आणि ठाकरे कुटुंब एकत्र येतंय? सर्व चर्चांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

त्यांनी पुढे बोलताना सांगितले की या भागात हायवे होत आहे. त्यामुळे सैन्याची नेआण सहज आणि सोपी होणार आहे. त्याच बरोबर हायवे मुळे अरुणाचल प्रदेशातील पर्यटन ही वाढण्यास मदत होईल असंही ते म्हणाले. पर्यटकांना आकर्षीत करणारे अनेक कार्यक्रम अरुणाचल प्रदेशात होत असल्याचंही त्यांनी या निमित्ताने सांगितले. लोकांचे जिवनमान उंचावण्यासाठी सेना आणि ITBP बरोबर अरुणाचल प्रदेशचे सरकार काम करत आहे असंही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात जवळपास 2500 किमीचा हायवे बनणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - Cabinet meeting: मत्स्य व्यवसायाला "कृषीचा दर्जा", कॅबिनेटचा मोठा निर्णय, 'हे' मिळणार फायदे

अरुणाचल प्रदेशातील मेचूका हे गाव भारत- चीन सीमेवर आहे. इथं पहिल्यांदा इंटरनॅश्नल अॅडवेंचर रेसचे आयोजन करण्यात आलं होतं. यात जगभरातले खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी मेचुकासाठी 100 कोटीच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. तर अरुणाचल प्रदेशातील काही भागांची नावं बदलणं हे चीनचा एक राजकीय स्टंट असल्याचं पर्यटन मंत्री पीडी सोना यांनी सांगितलं. त्यामुळे त्याची आम्ही जास्त काळजी करत नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. चीनने नेहमीच अरुणाचलवर आपला दावा केला आहे असं ही ते म्हणाले. पण इथली जनता, इथली संस्कृती ही भारतीय असल्याचं त्यांनी सांगितलं. चीन काही बोलला तरी त्याचा फरक पडत नाही असंही ते म्हणाले. इथल्या जनतेला भारतीय असल्याचा गर्व आहे, हे त्यांनी स्पष्ट केलं.