NDTV Marathi Manch Conclave: मुंबईचा प्रदूषणाचा विळखा सोडवणार कसा? सिद्धेश कदम यांनी सांगितला मेगाप्लॅन!

NDTV Marathi Manch Conclave: महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महत्वाचे विधान केले. त्यासोबतच त्यांनी प्रदूषण नियंत्रणाबाबत सुरु असलेली उपाययोजनांबाबतही माहिती दिली. 

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई: महाराष्ट्रासमोर अनेक आव्हांनांपैकी एक आव्हान म्हणजे प्रदूषण.. राज ठाकरेंनी मांडलेला प्रदूषणाचा मुद्दा असो किंवा मेट्रोसिटीमधील प्रदूषणामुळे धोक्यात येणारे आरोग्य असो, या प्रदूषणाच्या विळख्यातून महाराष्ट्राला कसे वाचवणार? याबाबत एनडीटीव्ही मराठीच्या मंचावर सविस्तर चर्चा झाली. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी महत्वाचे विधान केले. त्यासोबतच त्यांनी प्रदूषण नियंत्रणाबाबत सुरु असलेली उपाययोजनांबाबतही माहिती दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ))

प्रदूषण नियंत्रणाच्या योजना काय आहेत?

'ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचे व्हिजन आहे त्यामध्ये आपण बायोडाव्हरसिटीचा बॅलन्स कसा करायचा यामध्ये आमची भूमिका मोठी आहे. त्यात आम्ही छोटी छोटी पाऊले उचलत आहोत त्याचा परिणाम आत्ता नाही पण काही काळाने दिसेल. आज जनतेला कल्पना नाही की आम्ही काय करतो त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांच्या कामांमध्ये वेगवेगळ्या संस्थांशी संवाद सुरु केले आहेत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काम करत आहोत. सामान्य नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याच्याही प्रयत्न सुरु आहेत, असे सिद्धेश कदम यांनी सांगितले. 

'एखाद्या कंपनीला लगेच त्यांच्या कंपनीला मदत करुन त्यांची आर्थिक उलाढाल झाली तर त्यामध्ये आमचा सहभाग असणे महत्वाचे आहे. नागपूर शहरातील सांडपाणी प्रक्रिया करुन एका थर्मल प्लॅंटला जाते. आम्ही सर्व पालिकांना हेच सांगतो की तुमच्या सांडपाण्यापासून नदी नाल्यात न सोडता त्यापासून आर्थिक उलाढाल होईल का? हे पाहणे महत्वाचे आहे..आम्ही जनतेशी,कॉलेज विद्यार्थ्यांशी थेट संवाद करण्यासाठी प्रयत्न करतोय. एक चांगला उपक्रम राबवत आहोत. त्याचा आम्हाला फायदा होत आहे.. असेही सिद्धेश कदम म्हणाले.

NDTV Marathi Manch: 'राज्यातील तपासणी लॅबबाबत कडक कायदा..' आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मोठी घोषणा

'ज्या ज्या शहरांना मी भेटी देतो त्या शहरातील आयुक्तांशी आम्ही चर्चा करतो. त्या शहरातील सांडपाणी, औद्योगिक वेस्ट पाणी पुन्हा प्रक्रिया करुन त्यामधून आर्थिक सक्षम होण्याची अनेकांची तयारी आहे. त्यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो. त्यांना पाहिजे ती आर्थिक मदत करायला आम्ही तयार आहोत..आम्ही त्यांना प्रोत्साहन करायला आम्ही तयार आहोत..  यामध्ये कारवाई करण्याची वेळ आली तरी आम्ही थांबत नाही, राजकीय प्रश्न आले तरी जुमानत नाही, असे म्हणत प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर कारवाई केली जात असल्याचेही कदम यांनी सांगितले. 

'मुंबईमध्ये बोअरवेलमुळे पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. या गोष्टी आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पाणीसाठा जतन करण्यासाठी मुंबई पालिकेला सूचना केल्या आहेत. त्यासोबतच मुंबईमध्ये ज्या पद्धतीने प्रदूषणाचा विषय येत आहे. मुंबईत काँक्रिट रोडचे जाळे पसरत आहे.. सिमेंट, मशिनरीचे प्रदूषण कसे थांबवायचे त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतला. त्यामध्ये नवा प्लॅन हा उघड्यावर नसेल. त्यासोबतच त्याचे कॉन्ट्रॅकर कोणती वाहने वापरतात, ती किती जुनी आहेत. याबाबतही दक्ष आहोत. आपण सर्व खासगी वाहने सोडून सरकारी दळणवळणाची साधने वापरु त्यावेळी हे प्रदूषण नियंत्रणात येईल. त्यासाठी सरकारी सेवांचे जाळे तयार करु.. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

(नक्की वाचा- 'कोणासाठीही पॉलिटिकल स्पेस..', CM फडणवीसांच्या विधानाने विरोधकांची धाकधुक वाढणार!)