NEET UG Exam 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) चा ढिसाळ कारभार काही संपत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एकीकडे पेपर फुटी प्रकरणाने विद्यार्थी तसेच पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशातच आता पुर्नपरिक्षेतही नीटचा भोंगळ कारभार समोर आला आहे. पेपरफुटीच्या प्रकरणानंतर आता एक नवीन घटना समोर आली आहे, ज्यात नागपूरच्या एका विद्यार्थ्याला थेट अबू धाबी (UAE) मध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.
NTAचा भोंगळ कारभार; नागपूरच्या विद्यार्थ्याला परदेशातील परीक्षाकेंद्र
समोर आलेल्या माहितीनुसार, नागपुरमधील विद्यार्थी अब्दुल्ला याला २१ जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी परदेशातील केंद्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अब्दुल्लाने नीट (NEET) परीक्षेसाठी अर्ज केला होता. मागील परीक्षेत, त्याला नागपूरच्या शंकर नगरमधील सरस्वती विद्यालयात परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, पेपरफुटीमुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली.
फेरपरीक्षा २१ जून रोजी होणार असून, त्यासाठी १४ जून रोजी प्रवेशपत्रे जारी करण्यात आली होती. जेव्हा अब्दुल्लाने आपले प्रवेशपत्र डाउनलोड केले, तेव्हा त्याला धक्काच बसला. परीक्षा केंद्र भारतातील कोणत्याही शहरात नसून थेट अबू धाबीमध्ये होते. नीटचा अर्ज भरताना, अब्दुल्लाने परीक्षा केंद्रासाठी नागपूरला पहिली, वर्धाला दुसरी आणि भंडाराला तिसरी पसंती दिली होती. मात्र, एनटीएने या तीन शहरांना वगळून त्याला थेट परदेशातील अबू धाबी इंडियन स्कूलमध्ये एक केंद्र दिले.
माजी शिक्षण मंत्री डॉ. अनीस अहमद यांनी म्हटले आहे की, नीटसारख्या प्रतिष्ठित परीक्षेची थट्टा करण्यात आली आहे. एनटीएने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे आणि नागपूर किंवा जवळच्या शहरात केंद्र देऊन विद्यार्थ्याला सुधारित प्रवेशपत्र जारी करावे. विद्यार्थ्याचे वडील, मोहम्मद तालिब म्हणाले, "अबू धाबी केंद्र पाहून आम्हाला धक्का बसला आहे. आमच्याकडे पासपोर्टही नाही आणि पुरेसा वेळही नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मुलाला परीक्षेसाठी परदेशात पाठवू शकत नाही.
BT Deshmukh: विदर्भाच्या शिक्षक चळवळीचा महामेरू हरपला! प्रा. डॉ. बी. टी. देशमुख यांचे निधन
दरम्यान, या निष्काळजीपणामुळे मुलाची परीक्षा चुकण्याची शक्यता आहे. मात्र, आम्ही एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपली चूक मान्य केली आहे आणि पडताळणीनंतर शनिवारपर्यंत नवीन प्रवेशपत्र देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, जोपर्यंत आम्हाला नवीन प्रवेशपत्र मिळत नाही, तोपर्यंत आम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world