नोव्हेंबर महिन्यात होतोय आधार कार्डसंबंधित सगळ्यात मोठा बदल, कोट्यवधी नागरिकांना होणार फायदा

Aadhaar Card New Rules: भारतातील सगळ्या Aadhaar Card धारकांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. नोव्हेंबर महिन्यात एक मोठा बदल होणार असून याचा फायदा सगळ्या आधार कार्ड धारकांना होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Aadhaar Card New Rules: आधार कार्ड हे भारतातील सगळ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज बनले आहे. आधार कार्डाचा वापर विविध ठिकाणी ओळख पटविण्यासाठी आणि सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी होत असतो. देशातील कोट्यवधी आधार कार्ड धारकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. नोव्हेंबर 2025 पासून आधार प्राधिकरणाने काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमुळे आधार कार्ड धारकांना नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर ऑनलाईन अपडेट करता येतील. 

नक्की वाचा: नोव्हेंबर महिन्यात बँका किती दिवस बंद राहणार? बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी पाहा

1 नोव्हेंबरपासून आधार कार्ड धारकांसाठी नेमका काय बदल होतोय?

आतापर्यंत आधार कार्ड धारकांना नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार केंद्रांवर जावे लागत होते. यासाठी अपॉईंटमेंट घ्यावी लागत होती आणि काही तांत्रिक अडचण आली तर अपडेटसाठीची ही प्रक्रिया वेळखाऊ बनत होते. यामुळे नागरिकांना त्रास होत होता. नागरिकांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून आधार केंद्रावर न जाता ऑनलाईन पद्धतीनेच  नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर बदलण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र बायोमेट्रीक अपडेटसाठी आधार केंद्रावर जावे लागेल. 

कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही

आधारसंबंधित बदलांमुळे नागरिकांना नाव, पत्ता, मोबाईल नंबर बदलण्यासाठी कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाही. UIDAI नागरिकांची माहिती पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हींग लायसन्स, रेशन कार्ड, मनरेगा, जन्म दाखला, शाळेची कागदपत्रे यासारख्या उपलब्ध कागदपत्रांच्या सरकारकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे तपशील मिळवेल आणि त्याची खात्री पटवून वापरेल. ज्यामुळे या प्रक्रियेसाठी कोणतीही कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाही. 

नक्की वाचा: आधारकार्ड ते बँक अकाऊंट.. 1 नोव्हेंबरपासून 'हे' 5 नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम

आधार कार्डातील बदलांसाठीचे शुल्क नोव्हेंबर 2025 पासून खालीलप्रमाणे असेल

  1. आधारसाठी नाव, पत्ता,मोबाईल बदलण्यासाठीचे शुल्क -75 रुपये (आधीचे शुल्क 50रुपये) 
  2. आधार कार्डसाठी बोटांचे ठसे, आयरीस स्कॅन, फोटो बदलासाठी- 125 रुपये (आधीचे शुल्क 100 रुपये)
  3. 5-7 आणि 15-17 वयोगटातील मुलांच्या आधार कार्डसाठी बायमेट्रीक बदलण्यासाठी- निशुल्क

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठीची मुदत काय आहे ?

UIDAI ने म्हटलंय की आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत आहे.  त्यापूर्वी हे दोन दस्तावेज एकमेकांशी जोडणे गरजेचे आहे. असे न झाल्यास तुमचे पॅन कार्ड रद्द केले जाईल आणि नव्या पॅन कार्डसाठी अर्ज करता असताना आधार कार्ड असणे गरजेचे असेल. 
 

Advertisement
Topics mentioned in this article