construction Rule: मुंबई- पुण्यातील बांधकामे धोक्यात? मेट्रोला भगदाड पडल्यानंतर कडक नियम, प्रशासनाचा निर्णय

यापुढे भूमिगत मेट्रोच्यावर असलेल्या सगळ्या बांधकामांसाठी  नवीन नियमावली तयार करणार असल्याचे समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

अजिंक्य धायगुडे, पाटील:

Mumbai Pune Metro News:  पुणे शहरातील शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलीस स्टेशनच्या समोर एका वाड्याच्या बांधकामासाठी बोअरवेलची खोदाई सुरू असताना स्वारगेट ते शिवाजीनगर मार्गे असलेल्या मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडले. या भगदाडामुळे मेट्रोचे मोठे नुकसान झाले आहे.  या घटनेनंतर मुंबई तसेच पुणे मेट्रो प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यापुढे भूमिगत मेट्रोच्यावर असलेल्या सगळ्या बांधकामांसाठी  नवीन नियमावली तयार करणार असल्याचे समोर आले आहे.

बांधकामांसाठी नवीन नियमावली! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलीस स्टेशनच्या समोर एका वाड्याच्या बांधकामासाठी बोरवेलची खोदाई सुरू असताना स्वारगेट ते शिवाजीनगर मार्गे का असलेल्या मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडले. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना वॉटर डिटेक्ट झाल्यावर त्यांनी थेट घरमालक असलेल्या धनंजय मोठे आणि ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला.  या घडलेल्या घटनेनंतर महापालिका आणि मेट्रो प्रशासन खडबडून जागे झाले.

Advertisement

पेठांमधील परिसरात अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शनची काम सुरू आहेत आणि अनेक वाड्यांचा प्रश्न देखील प्रलंबित आहेत. त्यामुळे येत्या काळात मेट्रोच्या बोगद्याच्यावर असलेले सगळे वाडे आणि इमारती बांधण्यासाठी महापालिका नवीन नियमावली आणणार आहेत. त्यासोबतच भूजल विभागाकडून बोरवेल खोदण्यासाठी वेगळी परवानगी देखील घ्यावी लागणार असल्याची माहिती आहे. 

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाचं! रामनवमीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल, 'हे' रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

ठेकेदार बोरवेल बांधत असताना फक्त बांधकामाची परवानगी घेतो आणि त्यासोबतच बोरवेलची देखील खोदाई करतात. पण आता ठेकेदारांना आणि घरमालकांना देखील बांधकाम करताना वेगवेगळ्या परवानगी घेण्याची गरज भासणार आहे.  हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे. या प्रकाराबाबत आम्ही नवीन नियमावली लवकरच सादर करू आणि शहराच्या मेट्रोचा जो प्रकल्प आहे त्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेऊ असं मत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केले.

मुंबई, मेट्रो प्रशासनाचाही मोठा निर्णय! 

पुण्यानंतर मुंबई मेट्रो प्रशासनानेही  इमारतींच्या पुनर्विकासासाठी मेट्रो रेल्वे प्राधिकरणाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे सूचनापत्र काढले आहे.   'मुंबई मेट्रो लाइन-३' चे अंदाजे ६.३५ मीटर व्यास असलेले दोन (२) बोगदे, अंदाजे २०-२२ मीटर अंतरावर व जमिनीपासून १७-२५ मीटर खोलवर असून, मुंबई मेट्रो लाईन-३ सरखनाच्या (नकाशात दाखवल्याप्रमाणे) दोन्ही बाजूस काही स्थावर मालमत्तेच्या खाली येत आहेत.

या क्षेत्रात कोणत्याही विकास/पुनर्विकासामुळे मेट्रो बोगदे, जमिनीच्यावर व खालील मेट्रो संस्थानांवर होणारा कोणताही प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी, मुंबई मेट्रो लाईन-३  क्षेत्रात येणारे विकासक  यांनी कोणताही विकास / पुनर्विकास सुरू करण्यापूवी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून मंजुरी घेणे अनिवार्य आहे, असं प्रशासनाने म्हटलं आहे. 

Advertisement

Kolhapur News: कोल्हापुरात पेट्रोल-डिझेलसाठी नवे नियम! इंधन खरेदीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा

नलिका किंवा विहिरी खोदणे, बांधकाम करणे किंवा पाडणे, भू-तांत्रिक तपासणी, उत्खनन, कोणत्याही पायाभूत सुविधांची उभारणी किंवा विकासासाठी "संचालक" (नियोजन व मालमत्ता विकास / एनएफबीआर), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, यांच्याकडे अर्ज करून अनुमती प्राप्त करावी लागेल, असे सूचनापत्र मेट्रो प्रशासनाने काढले आहे.