Nilesh Rane tweet: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री नितेश राणे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन विधाने केल्याने ते नेहमीच टिकेचे धनी होत असतात, त्यामुळे राणेंना पक्षातील नेत्यांनी समज द्यावी, अशी मागणी विरोधक असतात. मात्र नितेश राणेंची आक्रमक भाषा सुरुच आहे. अशातच आता नितेश राणे यांचे बंधु आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांनीच त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजप नेते नितेश राणे पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसला आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, असे विधान त्यांनी केली होती. नितेश राणेंनी हा टोला महायुतीमधील पक्षांनाच लगावला आहे का? असाही सवाल उपस्थित होत होता.
यावरुनच निलेश राणे यांंनी नितेश राणेंना भान ठेवण्याचा सल्ला दिला आहे. नितेशने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही. असा मोलाचा सल्ला लहान भावाला आमदार निलेश राणेंनी दिला आहे.
नक्की वाचा - Godavari River : तेलंगणाच्या सीमेवरील धरणात सहा मुलं बुडाली, नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश
दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी आपले बंधू नितेश राणे संयम बाळगण्याचा सल्ला दिलेला असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र नितेश राणे यांची भूमिका नेहमीच पक्षासाठी पूरक राहिल्याचे म्हटले आहे. निलेश राणे हे शिंदे सेनेत आहेत कदाचित शिंदे सेनेला नितेश रानेच धोरण मान्य नसेल, घरातला विषय आहे एकमेकांशी चर्चा करून तो संपवतील असं विखे पाटील वाशिममध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले.