Nitin Gadkari : 'सरकार म्हणजे बेकार काम', नागपुरातील अनुभव सांगत गडकरींनी दिला घरचा आहेर

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. एखादं काम करताना ते पूर्ण झोकून काम करतात. त्याचवेळी कामात अडथळे आले तर संबंधितांना सर्वांदेखत झापण्यासही ते मागे-पुढे पाहात नाहीत. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलतानाही याचा अनुभव आला. गडकरींनी यावेळी नागपूरमधील उदाहरण देत सरकारवरच टीका केली.

काय म्हणाले गडकरी?

माझी खूप इच्छा आहे की नागपुरात 300 स्टेडियम खेळण्यासाठी बनवाव पण माझ्या चार वर्षाच्या करिअर मध्ये माझ्या लक्षात आलं की सरकार म्हणजे बेकार काम आहे, असं गडकरींनी सुनावलं. 

कॉर्पोरेशन एनआयटी यांच्या भरवश्यावर कोणतेही काम होत नाही. यांच्याकडे चालत्या गाडीला पंचर करायचं अनुभव यांच्याकडे आहे, या शब्दात गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. 

( नक्की वाचा : Khadse vs Mahajan: 'महिलांबाबत गिरीश महाजनांचं नावंच का पुढं येतं?' खडसेंचा जुने संदर्भ देत थेट सवाल )
 

'राजकारण फुकटाचा बाजार'

एक व्यक्ती दुबईवरून माझ्याकडे आला आणि म्हणाला मी दुबईत स्पोर्ट स्टेडियम चालवतो. मी विचारलं कसे चालवता तर तो म्हणाला..15 वर्षाचा टेंडर देणार.. लाईट आम्ही देणार, पाणीची व्यवस्था, कपडे बदलण्याची व्यवस्था आणि मग मेंटंन तो करणार.. आणि खेळण्यासाठी येणाऱ्या मुलाकडून तो 500 किंवा हजार रुपये फी घेणार.

Advertisement

कुणालाही फुकटात शिकवू नये. मी तर राजकारणात आहे. इथे तर सर्व फुकटाचा बाजार असतो. सर्व वस्तू फुकटात हवी असते... मी फुकटात देत नाही, असंही गडकरींनी सुनावलं. 

आपल्याला 75 ते 80 वर्षापर्यंत चांगल जीवन कसे जगता येईल याची व्यवस्था करून ठेवायला हवी. जेव्हा आपले चांगले दिवस असतात तेव्हा याबद्दल आपल्याला विचार करायला हवा. चांगले दिवस असताना समोरून स्तुती करणारे खूप मिळतात कारण तेव्हा क्रेझ ग्लॅमर असते म्हणून जेव्हा वेळ आपली वेळ संपते तेव्हा कोणी विचार करत नाही, असंही गडकरींनी सांगितलं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article