RTO Online Service: आरटीओ कार्यालयाचे हेलपाटे बंद! 105 सेवा आता एका क्लिकवर; वाचा डिटेल्स

राज्य मार्ग परिवहन मंडळाने आरटीओ विभागाशी संबंधित असलेल्या १०५ सेवा पूर्णपणे ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे आता आरटीओ ऑफिसचे हेलफाटे घालण्याचा त्रास कायमचा बंद होणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

RTO 105 Online Services:  आरटीओ कार्यालयातील कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांची धावपळ थांबवण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. सारथी आणि वाहन ४.० या डिजिटल प्रणालीद्वारे आता सुमारे १०५ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे वाहनचालकांना आता छोट्या-मोठ्या कामांसाठी आरटीओ कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही.

Vidhan Parishad Election 2026: भाजपमध्ये लॉटरी कुणाला लागणार? जागा 6 इच्छुक 12, 'या' नावांमुळे चुरस वाढली

आरटीओ कार्यालयाचे हेलफाटे बंद, १०५ सेवा ऑनलाईन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाहन परवान्यांच्या संंबंधित अनेक कामांसाठी परिवहन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. मात्र आता राज्य सरकारने हा त्रास कायमचा बंद केला आहे. राज्य मार्ग परिवहन मंडळाने आरटीओ विभागाशी संबंधित असलेल्या १०५ सेवा पूर्णपणे ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे आता आरटीओ ऑफिसचे हेलफाटे घालण्याचा त्रास कायमचा बंद होणार आहे. 

Advertisement

 या ऑनलाईन सेवांमध्ये  परवाना संबंधित शिकाऊ व कायमस्वरूपी अनुज्ञप्ती License अर्ज, नूतनीकरण, पत्ता बदल आणि डुप्लिकेट लायसन्स, वाहन संबंधित नवीन वाहन नोंदणी, मालकी हस्तांतरण, एनओसी, आणि आरसी नूतनीकरण, ई-चलन भरणे आणि वाहन फिटनेस प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. यापूर्वी आरटीओच्या कामासाठी नागरिकांना एजंट किंवा मध्यस्थांवर अवलंबून राहावे लागत होते.

मात्र, आता नागरिक थेट sarathi.parivahan.gov.in किंवा vahan.parivahan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होणार असून कामात वेग येणार आहे. या सुविधेमुळे पिंपरी-चिंचवडसह परिसरातील हजारो वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, आरटीओ कारभारात आता खऱ्या अर्थाने डिजिटल क्रांती पाहायला मिळत आहे.

Health Alert: अरे बापरे! मोमोज खाल्ल्याने थेट मेंदूला आली सूज; 10 वर्षांच्या मुलीवर ओढवला मृत्यूचा प्रसंग