मुंबईकरांसाठी Good News! भुयारी मेट्रोतून थेट विमानतळ; फक्त काही मिनिटात पूर्ण होणार ‘हा’ प्रवास

Mumbai Metro T2 Walkway: विमान प्रवासाला जाणाऱ्या लोकांची धावपळ कमी होणार असून, त्यांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. मेट्रो प्रशासनाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Metro-3's New Foot Over Bridge: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई मेट्रो-३ च्या नवीन पादचारी पुलामुळे आता विमानतळाचे टर्मिनल-२ फक्त १०० मीटरवर आले आहे. यामुळे विमान प्रवासाला जाणाऱ्या लोकांची धावपळ कमी होणार असून, त्यांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. मेट्रो प्रशासनाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) टर्मिनल-२ आणि मुंबई मेट्रो-३ (एमएमआरसी) स्टेशनला जोडणारा नवीन पादचारी पूल (Foot Over Bridge) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे आता मेट्रो स्टेशनवरून थेट टी-२ टर्मिनलला केवळ १०० मीटर चालत जाता येणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

मेट्रो-३ स्टेशनच्या A1 लिफ्टमधून बाहेर आल्यावर हा पूल थेट टी-२ टर्मिनलला जोडतो. विशेष म्हणजे, तुम्ही ट्रॉली घेऊन या पुलावरून थेट टर्मिनलमध्ये जाऊ शकता, ज्यामुळे तुमचं सामान घेऊन तुम्हाला इतरत्र फिरावे लागणार नाही. यामुळे वेळेची बचत होईल आणि तुमचा प्रवास अधिक सुखद होईल. 

हे पाऊल म्हणजे मुंबईची वाहतूक व्यवस्था अधिक स्मार्ट बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे केवळ विमानतळाला जाणाऱ्या प्रवाशांनाच नाही, तर सर्वसामान्य प्रवाशांनाही फायदा होणार आहे. कारण यामुळे मेट्रोचा वापर वाढेल आणि रस्त्यांवरील गर्दी कमी होईल. वाहतूक कोंडीत अडकून विमान सुटण्याची भीती आता राहणार नाही. आता फक्त मेट्रो पकडा आणि वेळेवर विमानतळावर पोहोचा. यामुळे प्रवाशांचा मोठा ताण कमी होणार आहे.

Advertisement

Marathi Vs Hindi: 'मेलो तरी मराठी बोलणार नाही'; ट्रॅव्हल ब्लॉगरचा माज, VIDEO व्हायरल