Gokul New Product : दिवाळी हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस. या दिवसात घर उजळून निघतं. अंधारावर मात करणाऱ्या या सणात नवी सुरुवात केली जाते. दिवाळीच्या निमित्ताने गोकुळ दूध उत्पादक संघ ग्राहकांसाठी चांगली बातमी घेऊन आले आहेत.
दिवाळीच्या मुहूर्तावर गोकुळने दोन नवे पदार्थ बाजारात आणले आहेत. यामध्ये गुलाबजाम आणि चीजचा समावेश आहे. गेल्या महिन्यात गोकुळ संघाच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोकुळ संघाचे अध्यश्र नवीद मुश्रीफ यांनी नव्या प्रॉडक्टविषयी घोषणा केली होती. गोकुळचं चीज आणि आईस्क्रिम बाजारात आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. दरम्यान आता गोकुळचे चीज आणि गुलाब जाम हे दोन प्रॉडक्ट बाजारात दाखल झाले आहेत.
नव्या प्रॉडक्टची किंमत किती?
गोकुळच्या साजूक तुपातील गुलाबजामची किंमत
एक किलो - २७० रुपये
अर्धा किलो - १३५ रुपये
प्रोसेस्ड चीज
एक किलो - ५६५ रुपये
२०० ग्रॅम - १३० रुपये
नक्की वाचा - Gokul Milk : नाविद मुश्रीफ कसे बनले गोकुळचे अध्यक्ष? वाचा Inside Story
सध्या बाजारात गोकूळच्या अनेक प्रोडक्टचा समावेश आहे. यामध्ये गोकुळचे दूध, दही, बटर, ताक, श्रीखंड, बासुंदी, लस्सी, आम्रखंड, तूप, पनीर, फ्रूटखंड, फ्लेवर्ड दूध आणि गोकूळ पेढा यांचा समावेश आहे.आता यामध्ये गोकुळचं प्रोसेस्ड़ चीज आणि गुलाबजामची भर पडली आहे.
बाजारात गोकुळची स्पर्धक कंपनी अमुलनेही अनेक पदार्थ बाजारात पाहायला मिळतात. अमूलनेही सप्टेंबर महिन्यात अनेक खाद्यपदार्थांच्या किमती कमी केल्या आहेत. अमुलचं एक किलो चीजची किंमत ५७५ होती. त्यात ३० रुपये कमी करण्यात आले असून ती आता ५४५ झाले आहेत. अमुलचा ब्रँड (चीज-बटर) खरेदीदारांमध्ये प्रस्थापित आहे. अशावेळी ही साखळी तोडण्यासाठी गोकुळला आणखी क्लृप्त्या आणण्याची गरज लागणार आहे.