Thalassemia disease : महाराष्ट्र थॅलेसेमिया मुक्त करणार, काय आहे हा आजार? हिमोग्लोबिनशी कसा आहे संबंध?

रुग्णाच्या रक्तातील हिमोग्लोबिनवर परिणाम करणारी अवस्था म्हणजे थॅलेसेमिया.

जाहिरात
Read Time: 2 mins

Thalassemia disease : थॅलेसेमिया आजारापासून महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे अभियान' 8 मे 2025 पासून सुरू करण्यात येत आहे. थॅलेसेमिया रुग्णांची राज्यस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी या आजाराची तपासणी होण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याची चर्चा झाली. थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार असून पालकांमध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभियानाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी राज्यातील सर्व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या आहेत. गरोदर मातांची सिकलसेलसह थायलेसेमियाची तपासणी करण्यासाठी नियोजन करावे. यासाठी सीएसआर फंड मिळण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. सध्या अस्तित्वास असलेल्या 104 या टोल फ्रि कमांकावरही या आजाराविषयीची माहिती  व समुपदेशन उपलब्ध करून द्यावे.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Dixit Diet : दीक्षित जीवनशैली म्हणजे काय? या पद्धतीनं लठ्ठपणा आणि मधुमेहावर मात कशी करता येते?

थॅलेसेमिया आजार काय आहे?

रुग्णाच्या रक्तातील हिमोग्लोबिनवर परिणाम करणारी अवस्था म्हणजे थॅलेसेमिया. थॅलेसेमियामध्ये रुग्णाच्या रक्तातील हिमोग्लोबिनवर परिणाम होतो. थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण अत्यंत कमी असतं. किंवा अनेक ठिकाणी तयार होत नसतं. शरीरातील  तांबड्या रक्तपेशी हिमोग्लोबिनचा वापर करून शरीरातील ऑक्सिजन शरीरभर पुरवत असतात. मात्र हिमोग्लोबिन तयार होत नसल्याने ही रुग्ण अॅनिमिक होतात. त्यांना सतत दम लागतो, थकवा येतो, श्वास घेताना त्रास जाणवतो.  काही अभ्यासानुसार, जनुकीय दोषामुळे हिमोग्लोबिनच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि थॅलेसेमिया आजाराची लागण होते. त्यामुळे गर्भवती महिलांकडे अधिक लक्ष दिलं जातं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article