मंगेश जोशी, प्रतिनिधी
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं उघड झालं आहे. या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हवाई कारवाई (Operation Sindoor ) केली. दोन्ही देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुट्टीवर असलेल्या जवानांना तातडीनं सीमेवर बोलवण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचरोमधील नवविवाहित जवान मनोज ज्ञानेश्वर पाटील देखील तातडीनं कर्तव्य बजावण्यासाठी सीमेवर रवाना झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनोजचे पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील यामिनी रामचंद्र पाटील हिच्याशी लग्न झाले. या लग्नासाठी 30 दिवसांची सुट्टी घेऊन मनोज पाटील गावी आले होते. 5 मे रोजी लग्नाचा संपूर्ण सोहळा अतिशय थाटामाटात पार पडला. विवाहाच्या दुसऱ्या दिवशी नवविवाहित पत्नी आणि आई-वडिलांसह मनोजनं देवदर्शन केले. 8 तारखेला विवाह निमित्त सत्यनारायणाच्या पूजेचे नियोजन करण्यात आले होते मात्र त्यापेक्षाही कर्तव्याला प्राधान्य देण्याचा निर्णय हा मनोजने घेतला.
विशेष म्हणजे मनोजची पत्नी नववधू यामिनी हिनेही देशावा बजावण्साठी मनोजला प्रोत्साहन दिले. तर, देशसेवेसाठी आपला मुलगा जात आहे याचा आपल्याला अभिमान असल्याची भावना मनोजचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : Operation Sindoor भारताच्या 'या' 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न निष्पळ, वाचा कुठं होणार होता हल्ला )
मनोजला निरोप देण्यासाठी त्याचे कुटुंबीय तसंच मित्रमंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मनोजचा अभिमान असल्याची भानना या मित्रांनी व्यक्त केली. नवरा, मुलगा, भाऊ, मित्र अशा वेगवेगळ्या रुपात कर्तव्य बजावत असलेले मनोज पाटील यांनी देशसेवेचं कर्तव्य बजावण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याबद्दल सर्वांनाच त्यांचा अभिमान होता. पण, अखेरच्या क्षणी कुटुंबीयांच्या अश्रृचा बांध फुटला आणि भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील एक अत्यंत आनंदाचा क्षण, या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत असतो. विवाहनंतर जोडीदारासोबत सुखी संसाराचे पाहिलेले स्वप्न त्याचा आनंद अनुभवयाची प्रत्येकाची इच्छा असते मात्र देव देश आणि धर्म याकरता सर्व स्वप्नांवर तिलांजली वाहत मनोज पाटील या जवानाने देशसेवेला आणि कर्तव्याला प्राधान्य देत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.