Maharashtra Padma Awards 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील ११३ पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच वर्ष महाराष्ट्रासाठी विशेष आहे. यंदा राज्यातील सर्वाधिक दिग्गजांचा पद्म पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील तब्बल १५ जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
देशातील पद्म पुरस्कारांची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्राला - 15, तामिळनाडूतून - 13, उत्तर प्रदेश - 11, पश्चिम बंगाल - 11, कर्नाटक - 8, केरळ - 8 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला असून यामध्ये महाराष्ट्रातील पद्म पुरस्कारांची संख्या अधिक आहे.
महाराष्ट्रातून कोणाला पद्म पुरस्कार जाहीर...
पद्म विभूषण
१ धर्मेंद्र सिंह देओल (मरणोत्तर) – कला
पद्म भूषण
२ अल्का याज्ञिक – कला
३ पियुष पांडे (मरणोत्तर) – कला
४ उदय कोटक – व्यापार व उद्योग
पद्मश्री
५ डॉ. आर्मिडा फर्नांडिस – वैद्यकीय सेवा
६ अशोक खाडे – व्यापार व उद्योग
७ भिकल्या लाडक्या धिंडा – कला
८ जनार्दन बापुराव बोथे – सामाजिक कार्य
९ जुझर वासी – विज्ञान व अभियांत्रिकी
१० माधवन रंगनाथन – कला
११ रघुवीर तुकाराम खेडकर – कला
१२ रोहित शर्मा – क्रीडा
१३ सतीश शाह (मरणोत्तर) – कला
१४ सत्यनारायण नुवाल – व्यापार व उद्योग
१५ श्रीरंग देवबा लाड – शेती