9 hours ago

Pandharpur Wari Palkhi Marg : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी (Dnyaneshwar Maharaj Palkhi) पालखी सोहळ्याने सासवडकरांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आज सकाळी सोन्याच्या जेजुरीकडे प्रस्थान ठेवलं आहे. माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम सोन्याच्या जेजुरीत असणार आहे. आज सकाळीच (Vari News) लाखो वारकऱ्यांसह माऊलींचा पालखी सोहळा जेजुरी येथील पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला आहे. या पालखी सोहळ्याचा आजचा रात्रीचा मुक्काम सोन्याची नगरी म्हणजेच जेजुरीत असणार आहे. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची (Tukaram Maharaj Palkhi) पालखी यवतमधून रवाना झाली असून वरवंडच्या दिशेने निघाली आहे. 

Jun 24, 2025 12:10 (IST)

Live Update : वारीमध्ये ड्रोन्सवर पोलिसांची करडी नजर, पुणे ग्रामीण पोलिसांकडून 'अँटी ड्रोन गन'चा वापर

पुणे ग्रामीण पोलिसांनी पालखी सोहळ्या दरम्यान आकाशात उडणाऱ्या ड्रोन वर कारवाई केली आहे. करून पालखी सोहळ्या दरम्यान ड्रोन वापरण्यास बंदी केली असून सुद्धा अनेकांकडून ड्रोनचा सर्रास वापर होताना दिसत आहे. अशातच आता पुणे ग्रामीण पोलिसांनी "अँटी ड्रोन गन" चा वापर करून ड्रोन खाली उतरवले. ड्रोन उडणाऱ्या तरुणांवर सुद्धा आता ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी ने काल दिवे घाट लीलयापार केला. हेच विहंगम दृश्य टिपण्यासाठी आणि त्याच्या रील्स करण्यासाठी अनेक तरुणांनी ड्रोनचा वापर केला होता. मात्र ग्रामीण पोलिसांकडे २ अँटी ड्रोन गन आहेत त्याचाच वापर करत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Jun 24, 2025 08:59 (IST)

Live Update : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याची जय्यत तयारी, जेजुरी मंदिराचा गाभारा सजला

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज जेजुरी येथे येत आहे या सोहळ्याच्या स्वागताची तयारी जेजुरी नगरीत पूर्ण झाली असून अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे

Jun 24, 2025 08:49 (IST)

Live Update : संत तुकाराम महाराजांची पालखी यवतमधून रवाना...

संत तुकाराम महाराजांची पालखी यवतमधून रवाना झाली असून वरवंडच्या दिशेने मार्गस्थ...

Jun 24, 2025 08:46 (IST)

Live Update : पालख्या पुण्यात मुक्कामी असताना सफाईदूत ऑन ड्युटी

पालख्या पुण्यात मुक्कामी असताना सफाईदूत ऑन ड्युटी

पुणे शहरामध्ये यंदाही पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला केला. पुणे शहरामध्ये अस्वच्छता निर्माण होणार नाही याकरिता 16 ठिकाणी कंटेनर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी मुक्कामी असणाऱ्या दिवशी परिसरात कोणत्याही अस्वच्छता राहणार नाही याकरिता भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य विभागातील सेवाकांमार्फात तीन सत्रात रस्ते झाडणकाम व कचरा पडल्यास त्वरित कचरा उठाव, औषध फवारणी करणेत आले.

पुणे शहरामधून संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम महाराज यांची पालखी प्रस्थान केल्यानंतर, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावरील सर्व ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागातील सेवाकांमार्फात एकूण ओला 16 टन 252 किलो आणि सुका 98 टन 93 किलो असा मिळून 114 टन 345 किलो कचरा वर्गीकृत करून उठाव करण्यात आला.