संकेत कुलकर्णी, पंढरपूर: विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या तीन महिला भाविक चंद्रभागा नदीमध्ये बुडाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. यामध्ये दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला आहे. सुनीता सपकाळ आणि संगीता सपकाळ अशा मृत्यू झालेल्या दोन महिला भाविकांची नावे आहेत. त्या जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी असून तिसऱ्या महिलेचा शोध सुरु आहे.
Pandharpur News: पंढरपुरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे मिळणार, अजित पवारांची घोषणा
पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह राज्याबाहेरील पर्यटक येत असतात. पंढरपुरात आल्यावर प्रत्येक भाविक प्रत्येक नागरिक हा " पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे " या संतुक्तीप्रमाणे प्रथम चंद्रभागात स्नानासाठी जातो. शनिवारी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील काही महिला आज पंढरपूर येथे आल्या होत्या.
पंढरपुरात आल्यानंतर सर्व महिला चंद्रभागेच्या तटावर भक्त पुंडलिक मंदिराजवळच स्नानसाठी आल्या. मात्र यावेळी तीन महिला पाण्याचा अंदाज न आल्याने चंद्रभागेत बुडाल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सुनिता आणि संगीता सपकाळ या चंद्रभागेच्या पाण्यात बुडाल्या. यामध्येच या दोघींचा मृत्यू झाला. तसेच यावेळी आणखीन एक महिला देखील चंद्रभागेत बुडाल्याची घटना घडली. मात्र संगीता आणि सुनीता या दोघींचे मृतदेह चंद्रभागेत सापडले आहेत. तिसऱ्या महिलेचे शोधकार्य अद्याप सुरू आहे.
Pandharpur Vitthal Temple: गरिबाच्या विठ्ठलाची वाढली श्रीमंती, आषाढी वारीत जमा झाले इतके दान
विठ्ठल दर्शनापूर्वीच जालन्यातील सुनिता आणि संगीता या चंद्रभागेत बुडून मृत्यू पावल्या. चंद्रभागेच्या ताटावरील महादेव कोळी समाज आणि पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेने या महिलेंचे शोध कार्य करून त्यांना वाचवले. या घटनेनंतर चंद्रभागेच्या ताटावर कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने एक रेस्क्यू टीम तैनात करण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे.