Pandharpur News: विठ्ठल-रूक्मिणी मंदिरास आषाढी यात्रेत कितीचं दान? आकडा आला समोर,पण गेल्या वर्षीच्या तुलनेत...

भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी 

आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 8 कोटी 92 लाख रुपयांचे दान केले आहे. तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून दान मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. 

आषाढी वारीत  भाविकांनी विठ्ठलाच्या चरणाजवळ 71 लाख 44 हजार 078 रुपये अर्पण केले आहेत.  तर  2 कोटी 93 लाख 97 हजार 076 रुपयांची देणगी दिली आहे. 83 लाख 47000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 46 लाख 31 हजार 103 रुपये भक्तनिवास, 2 कोटी 40 लाख 32 हजार 402 रुपये हुंडीपेटी, 15 लाख 27 हजार 443 रूपये परिवार देवता तसेच 96 लाख 72 हजार 937 रुपये सोने-चांदी अर्पण करण्यात आले आहे. तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 45 लाख 20 हजार 439  इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Trending News: मराठमोळ्या GenZ IPS अधिकाऱ्याचा जलवा! गँगस्टरना वेसण घालण्यासाठी लढवलीय भन्नाट शक्कल

मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 75 लाख 05291 रुपये अर्पण, 2 कोटी 88 लाख 33 हजार 569 रुपये देणगी, 94 लाख 04 हजार 340 रुपये लाडू प्रसाद विक्री, 45 लाख 41 हजार 458 रुपये भक्तनिवास, 1कोटी 44 लाख 71 हजार 348 रुपये हुंडीपेटी, 32 लाख 45 हजार 682 रूपये परिवार देवता तसेच 3 कोटी 59 लाख 61 हजार 768 रुपये सोने-चांदी अर्पण झाले होते. तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 12 लाख 45 हजार 075 रुपये व 3 इलेक्ट्रिक रिक्षा /बस चे 32 लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले होते.

नक्की वाचा - Pune News: पुण्यात रिक्षाची भाडेवाढ! 1 ऑगस्टपासून लागू होणार नवे दर, जाणून घ्या किती रूपये वाढणार

सन 2025 च्या आषाढी यात्रेत 10 कोटी 84 लाख 08 हजार 531 रुपये दान आले होते.  या वर्षीच्या यात्रेत  8 कोटी 92 लाख 72 हजार 478 रूपये इतके दान प्राप्त झाले आहे.मागील यात्रेच्या तुलनेत 1 कोटी 91 लाख 36 हजार 053 इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगीतले.