Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi : आज माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान, दौंडज खिंडीतील थांब्यानंतर पालखी मार्गस्थ

Mauli Palkhi : संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला आहे. माऊलींचा आजचा मुक्काम वाल्हे नगरीत असणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे 

Pandharpur Wari Palkhi Route : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी नगरीतील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर माऊलींचा (Saint Dnyaneshwar Mauli) पालखी सोहळा आज पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला आहे. आजचा मुक्काम महर्षी वाल्मिकींच्या पुण्यभूमीत म्हणजे वाल्हे नगरीत होणार आहे. सकाळच्या प्रवासात दौंडजच्या खिंडीत वारकऱ्यांचा मोठा थांबा असतो. आजही मोठ्या संख्येने वारकरी याच खिंडीत न्याहारीसाठी थांबले होते. 

टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठुनामाच्या जयघोषात जेजुरीतील भाविकांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला. दुपारी दोनच्या सुमारास पालखी वाल्हे नगरीत दाखल होणार असून, येथे भव्य समाज आरतीचे आयोजन करण्यात आलं आहे. पालखीतळ सुसज्ज असून, वाल्हे नगरीतील ग्रामस्थ आणि वारकरी मंडळी माऊलींच्या स्वागतासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. श्रद्धा, भक्ती, आणि परंपरेचा संगम असलेला हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने एकेक पाऊल टाकत पुढे जात आहे.

Advertisement

नक्की वाचा : Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक

माऊलींचा पालखीमार्ग...

आज माऊलींची पालखी जेजुरी येथून निघाली असून लवकरच पालखी वाल्हे येथे मुक्कामी पोहोचेल. साधारण 10.30 वाजता माऊलींची पालखी पुणे-पंढरपूर मार्गावरील दौडंज गाव येथे विश्रांतीसाठी थांबली होती. आज (25 जून) माऊलींची पालखी वाल्हे येथे पोहोचेल. त्या ठिकाणी माऊलींच्या पादुकांचं निरास्नान होणार असल्याची माहिती आहे. 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world