Pandharpur-Tirupati Train: पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेऊन तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पंढरपूर-तिरुपती ही साप्ताहिक रेल्वे आता 16 मेपासून नियमितपणे सुरू होत आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे रेल्वेमार्गाने थेट जोडली गेली आहेत.
गाडीचे वेळापत्रक आणि मार्ग
- तिरुपती-पंढरपूर साप्ताहिक गाडी दर शनिवारी तिरुपती येथून दुपारी 4 वाजता सुटेल.दुसऱ्या दिवशी रविवारी रात्री 7 वाजता ही गाडी पंढरपूरला पोहोचेल.
- पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक गाडी दर रविवारी पंढरपूर येथून रात्री 8 वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री 11.30 वाजता तिरुपतीला पोहोचेल.
(नक्की वाचा- Tamil Nadu Election: थलपती विजयच्या TVK ला काँग्रेसचा पाठिंबा; मात्र ठेवली मोठी अट)
गाडी कुठे-कुठे थांबणार?
ही रेल्वे प्रवासादरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणामधील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. महाराष्ट्रातील मोडलिंब, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर या स्थानकांवर थांबेल. कर्नाटक/तेलंगणातील बीदर, जहिराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, काचीगुडा, शादनगर, महबूबनगर येथे थांबेल. तर आंध्र प्रदेशातील वानपर्थी रोड, गदवाल, कर्नूल सिटी, धोन, गुटी, ताडपत्री, येरगुंटला, कडाप्पा, राजमपेटा आणि रेनिगुंटा येथे थांबेल.
(नक्की वाचा- PCMC Illegal Schools List: पिंपरी-चिंचवडमधील 'या' शाळा अनधिकृत; प्रवेश न घेण्याचे पालिकेचे पालकांना आवाहन)
भाविकांना होणार फायदा
आतापर्यंत पंढरपूरहून तिरुपतीला जाण्यासाठी भाविकांना खासगी ट्रॅव्हल्स किंवा सोलापूरला जाऊन रेल्वे पकडावी लागत होती. आता थेट रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.