संकेत कुलकर्णी, पंढरपूर
पंढरपूरमध्ये भाविकांना सोप्या पद्धतीने दर्शन मिळाव यासाठी मंदिर समितीने ऑनलाईन बुकिंग आणि टोकन सेवा सुरु केली आहे. या माध्यमातून अनेक भाविकांना अगदी सहज आपल्या विठुरायाचं दर्शन घेता येते. तासंतास रांगेत उभं न राहता अवघ्या काही मिनिटात यामुळे भाविकांना दर्शन मिळते. मात्र आषाढी वारी काळात ही ऑनलाईन बुकिंग व्यवस्था भाविकांसाठी बंद असणार आहे.
पंढरपुरात ऑनलाईन दर्शन बुकिंग आणि टोकन दर्शन वेबसाईटवर जाऊन बुकींग करावी लागते. असं केल्यासा भाविकांना काही वेळात दर्शन शक्य होते. यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क देखील आकारले जात नाही. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून अगदी मोफत ही सुविधा पुरवली जाते. मात्र आषाढी वारीच्या काळात 27 जूनपासून ही सुविधा बंद केली जाणार आहेत. आषाढी वारीनंतर पौर्णिमेचा गोपाळपूर काला झाल्यावर पुन्हा ऑनलाइन व्यवस्था सुर होईल.
(नक्की वाचा- Pandharpur News : आषाढी एकादशीच्या तोंडावर पंढरपुरात पुराचा धोका; प्रशासन अलर्ट मोडवर)
टोकन दर्शनासाठी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, बेंगलोर यांच्याकडून सेवाभावी तत्वावर टोकन दर्शन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांची वाढती संख्या पाहता दर्शन रांग आणि भाविकांच्या सोयींचे योग्य व्यवस्थापनावर काम करणे अत्यावश्यक आहे. या प्रणालीद्वारे भाविकांना आधीच दर्शनाची वेळ निश्चित करून दर्शनासाठी रांगेत न थांबता, ठरावित वेळेत दर्शनहॉलच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश दिला जातो.
यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे होते. तसेच भाविकांचा वेळ वाचवण्यास मदत होते. टोकन दर्शन प्रणालीच्या माध्यमातून दर्शन बुकिंग करण्यासाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून बुकिग करता येते. बुकिंग साठी केवळ भाविकांचा एक फोटो आणि वैयक्तिक माहितीची गरज असते.
(नक्की वाचा - Shirdi Santhan News: शिर्डीमध्ये VIP भाविकांसाठी 'दर्शन ब्रेक' व्यवस्था! साई संस्थानचा मोठा निर्णय)
बोगस टोकनद्वारे भाविकांचा प्रवेशाचा प्रयत्न
आज टोकन दर्शन सुरू असताना काही भाविकांच्या टोकनवर दुसरे फोटो लावून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. मात्र टोकन दर्शनाच्या ऑनलाइन प्रणालीमुळे बोगस टोकन घेऊन आलेले भाविक सापडले. एकच टोकन दर्शन बुकिंग करून त्यावर सात लोकांनी फोटो बदलत बोगस टोकन तयार केल्याचे आढळून आले. दर्शन व्यवस्थेत टोकनवर गोलमाल करत झटपट दर्शन घेण्याचा प्रयत्न हिंगोली जिल्ह्यातील भाविकांनी केला. मात्र भाविकांचा ऑनलाइनमधील गोलमाल उघडकीस आला आहे. याच भाविकावर आता कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली मंदिर प्रशासनाने सुरू केल्या आहेत.