Pandharpur News: तुम्हीही करा पंढरीच्या विठ्ठल- रखुमाईची सेवा! पुजेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु; कसं कराल बुकिंग?

यामध्ये विठ्ठलाच्या नित्य पूजेसह , पाद्य पूजा , महानैैवैद्य आणि तुळशीपूजांचे देखील बुकिंग थेट संकेतस्थळावरून भाविकांना करता येईल

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, पंढरपूर:

 Vitthal Rukmini Temple Online Puja:  महाराष्ट्राचे आराध्य दैवत समजले जाणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा करण्याची नामी संधी आता सामान्य भक्तांना मिळणार आहे. विठ्ठलाची नित्य महापूजा करण्यासाठीचे बुकिंग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर तीन ऑगस्ट पासून खुले करण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्याच्या पूजांचे बुकिंग हे संकेतस्थळावर भाविकांना घरात बसून करता येणार आहे. यामध्ये विठ्ठलाच्या नित्य पूजेसह , पाद्य पूजा , महानैैवैद्य आणि तुळशीपूजांचे देखील बुकिंग थेट संकेतस्थळावरून भाविकांना करता येईल. अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण घम यांनी दिली आहे.  त्यामुळे लाडक्या विठुरायाची पूजा करण्याची संधी मंदिर समितीच्या माध्यमातून भाविकांना खुली करण्यात आली आहे.

Pune News: सिंहगडावर जाण्यास पर्यटकांना बंदी, 'या' 3 कारणांमुळे घेण्यात आला निर्णय, बंदी किती दिवस?

 मंदिर समितीमार्फत आगामी ४ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीतील विविध पूजा, पाद्यपूजा तसेच महानैवेद्य सहभाग योजनांसाठी ऑनलाइन नोंदणीचा नवा टप्पा ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून खुला करण्यात येणार आहे.  ​महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश आणि देशातील इतरही राज्यांतील भाविकांकडून या उपक्रमाला नेहमीप्रमाणेच अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्पष्ट केले आहे.

मंदिर समितीच्या वतीने श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा आणि महानैवेद्य सहभाग योजना टप्प्याटप्प्याने ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या जात आहेत.  या नवीन टप्प्यात प्रामुख्याने सण, उत्सव आणि गर्दीचे महत्त्वाचे दिवस वगळून इतर साधारण दिवसांसाठी ऑनलाइन बुकिंगची सोय करण्यात आली आहे. यात श्री विठ्ठल नित्यपूजा, श्री रुक्मिणी माता नित्यपूजा, पाद्यपूजा, महानैवेद्य सहभाग योजना तसेच ऑगस्ट २०२६ मधील तुळशी अर्चन पूजेचा समावेश आहे.

Advertisement

कसे कराल बुकिंग? 

​इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन थेट नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणी प्रक्रिया करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक किंवा इतर अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत तातडीने मदत व मार्गदर्शन पुरवले जाईल. याविषयीचे सविस्तर नियम आणि अटी संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी भाविकांनी ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण घम यांनी दिली आहे.

कोणत्या पुजेला किती पैसे? 

​श्री विठ्ठल नित्यपूजा: २५,००० रुपये
​श्री रुक्मिणी माता नित्यपूजा: ११,००० रुपये
​महानैवेद्य सहभाग योजना: ७,००० रुपये
​पाद्यपूजा: ५,००० रुपये
​तुळशी अर्चन पूजा: २,१०० रुपये

नक्की वाचा - Rain News: ऑगस्ट महिन्यात किती पाऊस पडणार? हवामान विभागाने टेन्शन वाढवलं; काय आहे अंदाज?