जाहिरात

Ashadhi Wari 2025 Solapur : ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल, कुठे असणार पुढचा मुक्काम?

Pandharpur Palkhi 2025 enters Solapur district :सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश करताचमाऊलींच्या सोबत असलेल्या लाखो वारकऱ्यांनी  विठ्ठल नामाचा एकच जयघोष केला.

Ashadhi Wari 2025 Solapur : ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल, कुठे असणार पुढचा मुक्काम?
Ashadhi Wari 2025 Solapur : 4 जुलै रोजी पालखी सोहळा वाखरी इथे पोहोचेल
सोलापूर:

संकेत कुलकर्णी

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे.  (Pandharpur Palkhi 2025 enters Solapur district) धर्मपुरी येथे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी मंत्र्यांसह अनेक अधिकारीही टाळ वाजवत पालखी सोहळ्यात चालताना दिसले. आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले.(Pandharpur Palkhi 2025 enters Solapur district)  पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलीच्या पादुकांचे सपत्नीक मनोभावे दर्शन घेतले.  धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री गोरे यांच्यासह आमदार राम सातपुते, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते.  

( नक्की वाचा: विठ्ठल मंदिरातील VIP दर्शन बंद करण्याचे आदेश ) 

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरपासून किती दूर आहे?

सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश करताच (Pandharpur Palkhi 2025 enters Solapur district) माऊलींच्या सोबत असलेल्या लाखो वारकऱ्यांनी  विठ्ठल नामाचा एकच जयघोष केला.  सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होताच धर्मपुरी येथे माऊलींचा विसावा झाला. यानंतर माऊलींचा पालखी सोहळा नातेपुते या ठिकाणी मुक्कामाला आला आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात माऊलींच्या पालखी सोहळ्यात आलेल्या वारकऱ्यांना पंढरपूरची ओढ लागते. अवघ्या 90 किलोमीटर अंतरावर आणि पाच दिवसांच्या प्रवासावर पंढरी नगरी आलेली असते. नातेपुते इथे आल्यानंतर वारकऱ्यांना, पंढरपूर आता लवकरच गाठणार असल्याचा आनंद होत असतो.  

(नक्की वाचा: आषाढीसाठी पंढरपुरात 52'मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र', ही आहेत वैशिष्ट्य )

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा विसावा आणि मुक्काम कुठे असणार (Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Solapur Location)

जून महिन्याचा आजचा शेवटचा दिवस आहे (30 June 2025). ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने सोमवारी बरड ते नातेपुते असे 21 किलोमीटरचे अंतर पार केले. मंगळवारी म्हणजेच 1 जुलै 2025 रोजी ही पालखी  नातेपुते ते माळशिरस असे 18 किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. या टप्प्यात अत्यंत महत्त्वाचा आणि नेत्रदीपक रिंगण सोहळा पार पडणार आहे. माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे इथे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण 1 जुलै रोजी पार पडणार आहे (Ashadhi Wari 2025 Dnyaneshwar Mauli Palkhi Gol Ringan ) 

कसा असेल पालखीचा पुढचा प्रवास ? (Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025 Schedule) 

2 जुलै रोजी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025) माळशिरसवरून निघणार असून खुडूस फाटा (Ashadhi Wari 2025 Dnyaneshwar Mauli Palkhi Gol Ringan) इथे दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे. दुपारचे जेवण विंझोरी, ज्ञानेश्वर नगर इथे होईल आणि विसावा धावाबावी इथे तर मुक्का वेळापूर इथे असेल.

3 जुलै रोजी वेळापूर इथून पालखी निघेल आणि ठाकूरबुवाची समाधी इथे तिसरे गोल रिंगण ((Ashadhi Wari 2025 Dnyaneshwar Mauli Palkhi Gol Ringan) पार पडेल. दुपारचे जेवण तोंडले-बोंडले इथे झाल्यानंतर टप्पा इथे संत सोपानदेव आणि ज्ञानेश्वर माऊलींची भेट होईल. भंडी शेगाव इथे पालखीचा मुक्काम असेल.

4 जुलै रोजी भंडी शेगाववरून निघाल्यानंतर बाजीराव विहीर इथे दुसरे उभे (Ashadhi Wari 2025 Dnyaneshwar Mauli Palkhi Ubhe Ringan) आणि चौथे गोल रिंगण पार पडेल. पहिले उभे रिंगण 27 जून रोजी लोणंदजवळ चांदोबाचा लिंब इथे पार पडले होते. 4 जुलै रोजी पंढरपूरच्या वेशीवरील वाखरी इथे पालखीचा मुक्काम असेल. 5 जुलै रोजी वाखरी इथेच तिसरे उभे रिंगण पार पडेल. (Ashadhi Wari 2025 Dnyaneshwar Mauli Palkhi Ubhe Ringan) 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com