आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर (Solapur News) जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहे. आषाढी एकादशी (Pandharpur Wari 2025) अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. दरम्यान मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात विठ्ठलाच्या (Pandharpur Darshan) दर्शनासाठी येत आहे. 5 आणि 6 जुलै रोजी हा आकडा काही लाखांपर्यंत जाऊन पोहोचतो. अशावेळी प्रामाणिकपणे आणि 15 दिवस पायी चालत आलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन घेण्यात अडथळा येऊ नये यासाठी व्हिआयपी दर्शन बंद करण्याचे आदेश मंदिर प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करावे. असे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला दिले आहेत. सन 2010 मधील शासन निर्णयानुसार सर्व भाविकांना एक समान दर्शन देण्याच्या सूचना मंदिर समितीस केल्या आहेत. शासन निर्णयाचे उल्लंघन झाल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत थेट कारवाई करण्याचा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर समितीला दिला आहे.
नक्की वाचा - Saint Dnyaneshwar Maharaj Palkhi : आज माऊलींच्या पादुकांचं नीरास्नान, दौंडज खिंडीतील थांब्यानंतर पालखी मार्गस्थ
त्यामुळे आषाढीच्या तोंडावर आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद होईल. आणि सामान्य भाविकांना सहज आणि सुलभ दर्शनाचा लाभ घेता येईल. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.