ZP Election : पंढरपुरात नवा ट्विस्ट! जिल्हा परिषदेसाठी संभाजी ब्रिगेड मैदानात; 'या' पक्षांशी हातमिळवणी करणार?

Solapur ZP Election 2026 Updates : महापालिका निवडणुकीशी रणधुमाळी सुरू असतानाच ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकींची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Solapur ZP Election 2026 Updates : महापालिका निवडणुकीशी रणधुमाळी सुरू असतानाच ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणुकींची जोरदार तयारी सुरू झाली आहे. पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामध्ये आता संभाजी ब्रिगेडने देखील उडी घेतली असून आगामी निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पंढरपूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी संभाजी ब्रिगेड सज्ज झाली असून त्यांच्या प्रवेशामुळे ही लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

निवडणूक लढवण्यासाठी संभाजी ब्रिगेडने जोरदार तयारी सुरू केली असून पंढरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांमधील इच्छुक उमेदवारांची महत्त्वाची बैठक मंगळवारी (7 जानेवारी 2026) पार पडली. पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या प्रक्रियेत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे यांनी संघटनेच्या आगामी रणनीतीबाबत सविस्तर माहिती दिली. अनेक जागी सक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक मोठ्या ताकतीने लढवली जाईल, असे संकेत यावेळी देण्यात आले आहेत.

( नक्की वाचा : BMC Election 2026: संतोष धुरीनंतर आणखी एका बड्या नेत्यानं राज ठाकरेंची साथ सोडली, पत्रात केले खळबळजनक आरोप )

संभाजी ब्रिगेडची युतीबाबतची भूमिका

संभाजी ब्रिगेडने यावेळेस केवळ स्वबळावर लढण्याचे संकेत न देता युतीसाठीही दरवाजे उघडे ठेवले आहेत. किरणराज घाडगे यांनी स्पष्ट केले की, जर समविचारी पक्ष एकत्र येण्यास तयार असतील आणि त्यांनी युतीसाठी प्रस्ताव दिला तर आम्ही त्याचे स्वागत करू. स्थानिक परिस्थितीचा विचार करून आणि समविचारी पक्षांशी चर्चा करून युतीबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र, परिस्थिती काहीही असली तरी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत संभाजी ब्रिगेडचा प्रभाव सर्वत्र दिसेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

ग्रामीण राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषदेची निवडणूक याच आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात आता राजकीय बैठका आणि मुलाखतींचे सत्र वाढले आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : Ambernath News: अंबरनाथमध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसकडून निलंबन होताच 12 नगरसेवकांचा भाजपा प्रवेशाचा प्लॅन )

विविध आघाड्या आणि युतीचे समीकरण जुळवण्यासाठी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांना टक्कर देण्यासाठी आता संभाजी ब्रिगेडनेही रणशिंग फुंकल्याने पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण राजकारणात मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.